आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • मुंबई राज ठाकरे यांनी मुंबईत आज दोन सभा घेऊन सरकारवर हल्ला चढवला. गोरेगावमध्ये झालेल्या सभेत त्

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची 124 जागांवर अडली', राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज ठाकरे यांनी मुंबईत आज दोन सभा घेऊन सरकारवर हल्ला चढवला. गोरेगावमध्ये झालेल्या सभेत त्यांनी सरकारसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला. 'आरे'च्या प्रश्नावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना फैलावर घेतले. 'आरे'तली सर्व झाडे तोडून झाल्यावर उद्धव ठाकरे कारवाई करण्याचे आश्वासन देत आहेत. हे लोकांना शुद्ध मुर्ख बनवण्याचा धंदे चाललाय अशी टीका त्यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, "शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आता याच्यापुढे कोणाच्या पुढे जाणार नाही. आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची 124 जागांवर अडली." असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तसेच, "या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे. त्यामुळे, माझ्या शिलेदारांना विजयी करुन विधानसभेत पाठवा." असे आवाहन राज यांनी केले.राज ठाकरे पुढे म्हणाले की, "ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबधी देशात मी सोनिया गांधीनापासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो. मी सुचवलं होतं की ह्या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा, हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पण, विरोधक एकत्र आले नाही. त्यात ईडीची नोटीस आली, त्यावेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो की 'ईडीची चौकशी लावा काही करा माझं थोबाड बंद होणार नाही"
 

बातम्या आणखी आहेत...