आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पराभवानंतर माझ्या लोकांना तुम्ही दूर केलं, पण नाशिकवरच माझं प्रेम कधीच कमी झालं नाही'- राज ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे राज्यभर प्रचारांचा धुरळा उडवत आहेत. आज राज यांची नाशिकमध्ये प्रचारसभा पार पडली. नाशिकमध्ये काही काळ मनसेची सत्ता होती, पण मागच्या निवडणुकीत नाशिकच्या जनतेने मनसेला दूर केलं, त्यामुळे सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 

नाशिकमध्ये देखील त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. यावेळी ते म्हणाले की, "नाशिकमध्ये झालेल्या पराभवानंतर माझ्या लोकांना तुम्ही दूर केले पण नाशिकबाबत माझे प्रेम कमी झालेले नाही. नाशिकचा स्मार्ट रस्ता म्हणून 2 वर्षांपासून खोदून ठेवला आहे. नाशिकमध्ये जे काम केले ते करायला पाहिजे होते की नव्हतं, मला कधी-कधी प्रश्न पडतो. अशी माणसं तुम्हांला पाहिजे, तर कशाला हव्या या निवडणुका. कोण तुमच्यासाठी काम करेल, ज्या केलेल्या कामांपासून समाधान नसेल, जो आता कारभार सुरू आहे, नाशिक शहर ओरबाडण्याचा काम सुरू आहे, ते तुम्हांला मान्य आहे. इतके काम करून जो पराभव झाला तो माझ्या जिव्हारी लागला. या शहरात मी मनापासून काम केले. माझ्या सहकाऱ्यांनी मनापासून केले." असे राज म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील सहकारी बँका बंद पडल्या. पीएमसी बँकेतून लोकांना पैसे काढता येत नाहीयेत. गेल्या तीन दिवसात पीएमसी बँकेचे तीन ठेवीदारांचा मृत्यू झाला. हिंदुस्थान एरॉनटिक्स लिमिटेड, जिथे देशाची विमाने बनतात तिथला कामगार रडतोय कारण त्यांचा पगार होत नाहीये. हा कामगार देशोधडीला लागायची वेळ आली आहे तरी सगळं थंड आहे. लोकंच जर थंड राहणार असतील तर आम्ही निवडणुका लढण्याला आणि उमेदवार उभं करण्याला अर्थ आहे."


त्यांच्या स्वागतावरुन राज म्हणाले की, "लोकांना अडचणीत आणून, रहदारी थांबवून तुम्ही स्वागतं करू नका. आपले कार्यक्रम असे करू नका. आपला रस्ता जर कुणी अडवला, तर तुम्ही समोरच्या माणसाला काय शिव्या दिल्या असत्या? त्या शिव्या मी खाऊ का? त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की असे प्रकार करू नका. मी जिथे येऊन थांबेन, तिथे माझं स्वागत करा. आणि प्रत्येक वेळी मी येतो, तेव्हा स्वागत केलंच पाहिजे, असं काही नाही", असे राज ठाकरे म्हणाले.