आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राज्याला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे, माझ्या हाती विरोधी पक्षा द्या'- राज ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचास सभांचा धडाका लावला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सभा घेत आहेत. काल पुण्यातील त्यांची सभा पावसामुळे रद्द झाली. त्यानंतर आता मुंबईतील सांताक्रझमध्ये त्यांची पहिली प्रचार सभा होत आहे. यावेळी त्यांनी सरकारवर आणि कामांवर जोरदार टीका केली. दिवसेंदिवस नागरिकांचे आयुष्य बरबाद केली जातंय, असे ठाकरे म्हणाले.
सांताक्रुझमध्ये राज ठाकरेंनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, "विरोधी पक्षातील नेतेच भाजपात जात आहेत, त्यामुळे जनतेचे प्रश्न कोण मांडणार. सरकारमधील नेत्यांना पक्षाविरोधात एक शब्दही काढता येत नाहीये आणि विरोधी पक्षातील कोणी काढला तर, त्यांच्यावर ईडीची कारवाई केली जातेय."
पुढे राज म्हणाले की, "कोणीही उठतात आणि आमच्या सणांवर बंदी आणतात. दहीहंडी फोडू नका, आवाज वाढवू नका, ज्या ज्या वेळा या सणांवर बंदी आणलेली आहे, त्यावेळी मनसेने आवाज उठवला आहे, त्यामुळे सण साजरे झाले आहेत," असंही राज यांनी भाषणादरम्यान सांगितले.
पुढे राज म्हणाले की," सरकार बँका बुडवतंय आणि त्याचा भार सामान्य जनतेवर पडतोय. देशातील मोठ्या संस्था आणि न्यायालय संगनमत करुन चालत आहेत,त्यामुळे तुम्हाला न्याय कसा मिळणार. दिवसेंदिवस राज्यात वाहने वाढत आहेत. पण, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निस्तरली जात नाही. महाराष्ट्र देशातील सर्वात विकसित राज्य होतं, पण आज हेच राज्य अधोगतीला जात असेल तर बाकीच्या राज्यांचे काय होणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
"माझी विधानसभेची भूमिका आहे, एक मागणी करायला आलो आहे. राज्याला सध्या एका प्रबळ आणि कणखर विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधीपक्ष नेताच सरकारला सरळं करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. आता पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने विरोधी पक्षाची मागणी केली नसेल. मी आज करतोय, माझ्या हाती विरोधी पक्षाची धुरा द्या." अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.