आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे कुटुंबियांच्या कारला अपघात, राज यांच्या पत्नी आणि ड्रायव्हर किरकोळ जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना किरकोळ मार लागल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हे आपल्या कुटुंबासोबत आई एकवीरा देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला. 
राज ठाकरे हे आपल्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहिण यांच्यासोबत एकवीरा देवीचे दर्शन घेऊन पर येत होते. यावेळी सानपाडा जवळच्या सिग्नलला शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण ज्या कारमध्ये बसले होते त्या कारला अपघात झाला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एक रिक्षा मधे आली, त्या रिक्षाची धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या कारनेही शर्मिला ठाकरे या ज्या कारमध्ये बसल्या होत्या त्या कारला धडक दिली.