आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंच्या मुलूखमैदानी तोफेला पुण्यात जागा मिळेना, सभेसाठी पुण्यात मैदानच उपलब्ध होत नाहीये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हो ना करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले. पुणे शहरातून ते ९ ऑक्टोबरला आपल्या मुलूखमैदानी प्रचाराचा शुभारंभ करू पाहत आहेत. परंतु पुण्यातील विविध मैदानांची मनसे पदाधिकाऱ्यांनी चौकशी करूनही राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदानच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे अलका टाॅकीज चौकात तरी किमान सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 



विधानसभा निवडणुकीत मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडणारी शुभारंभाची सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठेतील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता. मात्र तेही मिळाले नाही. पावसाळ्यामुळे डेक्कन येथे नदीपात्रात सभा घेता येत नाही, असे कळवण्यात आले.


सरकारच्या दबावामुळे टाळाटाळ :  शहराध्य
क्ष
याबाबत शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, प्रचार सभा घेण्यासाठीची मैदाने शासनाकडून संबंधित संस्थांकडून ताब्यात घेत उपलब्ध करून देणे नियमानुसार बंधनकारक आहे. सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि पुण्यातील बहुतांश शाळांच्या मैदानावर भाजपप्रणित संस्थांचे ताबे असल्याने मैदान देण्यासाठी  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.