आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराजय दिसत असल्यानेच एकत्रित निवडणुकांचा डाव; राज ठाकरे यांनी साधला भाजपवर निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपला आगामी निवडणुकांमध्ये आपला पराजय स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच लोकसभेसह काही राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका घेण्याचा भाजपचा अट्टहास असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. छत्तीसगडसह इतर दोन-तीन राज्यांत ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, तिथे भाजपचे सरकार येणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. ठाण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


राज म्हणाले, सध्या देशात 'वन नेशन वन इलेक्शन'ची चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपला आता पराभव दिसू लागल्याने त्यांच्या डोक्यात हे खूळ आले आहे. पुण्यात रविवारी पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांच्या वक्तव्यावरही राज यांनी भाष्य केले. दरम्यान, पुण्यात झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सर्व नेते एकाच मंचावर असल्याची संधी साधत सर्वांवरच तोंडसुख घेतले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे असल्याने येत्या काही दिवसांत अनेक राजकीय कुरघोड्या पहायला मिळू शकतात. तसेच सत्ताधारी भाजप- शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की आणखी आरोप- प्रत्यारोप होतील. 


अजित पवारांनी मनाला का लावून घेतले? 
राज्यातील सिंचनाच्या सद्य:स्थितीवर बोलताना राज यांनी १९६० पासूनचा सिंचनासाठी खर्च झालेला पैसा कुठे गेला, असा सवाल केला होता. त्यावर अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना बोलघेवडे संबोधले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले, आपण केलेले वक्तव्य सरसकट आतापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांसाठी होते. अजित पवारांनी ते मनाला लावून का घेतले, हे कळत नाही. जर लोकसहभागातून जलसंधारणाची कामे होणार असतील तर मग सरकारचे काम काय? लाेकसहभागातून राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या गेल्या तर शासकीय यंत्रणा आणि अधिकारी काय करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी आपले अपयश आमिर खानच्या आड लपवू नये, असा टोलाही लगावला. 

बातम्या आणखी आहेत...