आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांकडून घेतले राजकारणाचे धडे..काकांच्या छत्रछायेत असे घडले राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 6 वा स्मृतिदीन आहे. त्यांच्या आठवणीत राज ठाकरे यांनी उलगडले त्यांच्या आयुष्यातील बाळासाहेबांचे स्थान. त्यानिमित्ताने divyamarathi.com आपल्‍या वाचकांना सांगत आहे. काका-पुतण्याच्या आयुष्यातील रंजक बाबी...

 

राज ठाकले हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व संस्थापक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मराठी भाषीकांसाठी लढले त्याप्रमाणे राज यांनी आपल्या पक्षाचे धोरण प्रामुख्याने महाराष्ट्र व मराठीभाषा यांच्याभोवतीच केंद्रित केले. मुंबई व परिसरात नव्याने वास्तव्यास येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला राज ठाकरे यांनी 2008 मध्ये टीकेचे लक्ष्य बनवले. आपल्या अनेक आंदोलनतून त्यांनी थेट परप्रांतिय लोकांविरोधात सुर आवळला. यातूनच राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.

 

राज ठाकरे यांना लहानपणापासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेबांना आपले दैवत माणतात. राज यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतच सुरू झाली. उमदे व प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवून देण्यात राज यांचा वाटा महत्त्वाचा समजला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची पक्षप्रमुख पद हे राज यांच्याकडेच जाणार अशी चर्चा होती. परंतु, शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली. त्यामुळे राज यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होतीच. त्यामुळे मार्च 2006 मध्ये शिवसेनेत आपल्याला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगून राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.

 

एक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी केली. शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदासाठी झालेला उद्धव-राज संघर्षानंतर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली.

 

...तर वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट बनवले असते

बाळासाहेब उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. राज यांनी त्यांच्याकडून चित्रकलेचे ढडे घेतले आणि त्यांच्याप्रमाणेच व्यंग्यचित्रकार झाले. वॉल्ट डिस्नी हे राज यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते, असे त्याचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...