आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक आहे प्रेम आणि सर्मपण भावना, याशिवाय मिळत नाही सुख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या जीवनात 1. प्रेम, 2. त्याग, 3. समर्पण, 4. संतुष्टी आणि 5. संस्कार, या पाच गोष्टी असतात त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते. या पाच गोष्टींशिवाय दाम्पत्य किंवा गृहस्थ जीवनाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सध्याच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये सर्मपण आणि संतुष्टी नसते. या कारणामुळे सुख कमी आणि दुःख जास्त वाटू लागते. गृहस्थ जीवनात या पाच गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. या पाच गोष्टींमधील एकही गोष्ट अपूर्ण असेल तर हे नातं फक्त नातं न राहता केवळ एक तडजोड बनून राहते. गृहस्थी एखाद्या तडजोडीवर टिकू शकत नाही. यामध्ये भावनांची उपस्थिती आवश्यक आहे. सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र राजा हरिश्चंद्रच्या आयुष्यावरून समजू शकते. राजा हरिश्चंद्र महान राजा हरिश्चंद्र यांचे चरित्र आणि त्यांची पत्नी तारामती यांच्या दाम्पत्य जीवनावरून आपण अनेक गोष्टी समजून घेऊ शकतो. राजा हरिश्चंद्र आपल्या सत्य वचनामुळे प्रसिद्ध होते. ते नेहमी खरे बोलत होते आणि या सत्यव्रतामध्ये त्यांची पत्नी तारामती त्यांना पूर्ण सहकार्य करत होती. तारामती अशी एकही गोष्ट घडू देत नव्हती, ज्यामुळे त्या व्रतामध्ये खंड पडेल. पहिले तत्व प्रेम, हरिश्चंद्र आणि तारामती दाम्पत्याचा पहिला आधार प्रेम होते. हरिश्चंद्र यांचे आपल्या पत्नीवर एवढे प्रेम होते की, त्यांनी आपल्या समकालीन राजांप्रमाणे कधीही दुसरे लग्न केले नाही. एक पत्नीव्रतचे पालन केले. तारामतीसाठीसुद्धा तिचे पतीच सर्वकाही होते. पतीच्या सांगण्यावरून तिने सर्व सुख, राजऐश्वर्य सोडून स्वतःला दासीचे रूप दिले होते. हे त्यांच्यामधील समर्पण आणि त्यागाचे उदाहरण आहे. दोघांनीही कधीच एकमेकांकडे कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नाही. जीवनात जे काही मिळाले त्याचा भाग्य समजून स्वीकार केला आणि संतुष्टी कायम ठेवली. दोघांनीही हेच संस्कार मुलांना दिले. प्रेम, समर्पण, त्याग, संतुष्टी आणि संस्कार हे पाच तत्त्व त्यांच्या दाम्पत्य जीवनात होते. यामुळेच सर्व राजपाट त्याग केल्यानंतरही ते आपल्या धर्माचे पालन करत राहिले. याच बळावर त्यांना पुन्हा एकदा सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले.

बातम्या आणखी आहेत...