आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिपी : भरडा वडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य : जाड पांढरे तांदूळ १ किलो, ज्वारी २०० ग्राम, अख्खे उडीद २०० ग्राम, केसरी चणे २०० ग्राम, धणे १५० ग्राम, जिरे ५० ग्राम, मेथी दाणे ३ चमचे. सर्व स्वच्छ निवडून बारीक दळून आणावे. हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.

 

कृती : हा दळून आलेला भरडा ४ वाट्या, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, तीळ आवडीप्रमाणे घालावे. वरून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. कढईत तेल तापत ठेवावे. केळीच्या / पळसाच्या पानावर पाण्याचा हात लावावा. भिजवलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून मध्यम जाड थापावे व मध्यम आचेवर तळून घ्यावे. उत्तम वडे होतात. दही, लोणी, मिरचीच्या लोणच्याबरोबर मस्त लागतात.

बातम्या आणखी आहेत...