आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajasthan 10 Year Old Girl Raped In Churu, Accused Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने केला बलात्कार, नंतर डोक्यात दगड मारुन काढला पळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीत मुलीने आरोपीचे नाव सांगितले

चूरू- राजस्थानातील चूरूमध्ये 10 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बलात्कारानंतर आरोपीने मुलीच्या डोक्यात दगड मारला आणि तिला मेल्याचे समजून विटांनी झाकले. पोलिसांनी आरोपी अकरम (21)ला अटक केले आहे.


घटना सोमवारी रात्री घडली. आरोपी मुलीच्या शेजारीच राहतो. सादुलपूरची पीडित मुलगी रात्री 9 वाजता चॉकलेट घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती परत येत असताना शेजारील अकरमने तिला अजून एक चॉकलेट देण्याचा बहाणा केला आणि निर्जणस्थळी घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार करुन तिच्या डोक्यात दगड मारला. यात मुलगी बेशुद्ध झाली. पण, आरोपीला वाटले की, ती मेली आहे, त्यानंतर आरोपीने तिला विटांनी झाकले आणि पळ काढला.

मुलीचा शोध घेतल कुटुंबीय घटनास्थळावर पोहचले

बराचवेळ मुलगी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला. दुकानदाराने मुलगी चॉकलेट घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेत त्या घटनास्थळापर्यंत गेले. तिथे विटांमध्ये दबलेली मुलगी दिसली. त्यानंतर कुटुंबीयांना तिला रुग्णालयात दाखल केले, तिथे तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत मुलीने आरोपीचे नाव सांगितले

मुलीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिने पोलिसांना आरोपीचे नाव सांगितले. मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी अकरमला पकडले.पोलिसांच्या चौकशीत अकरमने आपला गुन्हा कबुल केला.