आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा जागांवर बेतली राजकारणाची रोमहर्षक कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या उष्म्यात राजकारणाची रोमहर्षक कथा सहा जागांवरून लिहिली जाईल असे वाटते. राज्यात एकूण 25 जागा आहेत. मात्र, नेत्यांचे मन, आश्वासने तसेच भावनिक नाते यातील एकचतुर्थांश जागेपुरते मर्यादित आहे.

राजकीयदृष्ट्या या महत्त्वाच्या जागांवर मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा मुख्य भर आहे. संभ्रमावस्थेत अडकलेल्या कॉँग्रेसलाही या जागांबाबत आशा आहे. लाटेच्या वातावरणात दिसणारी आक्रमकता, भावुकता आणि राजकारणाचे डावपेच दौसा, जयपूर (ग्रामीण), बाडमेर, सीकर, झुंझुनू आणि अजमेर जागांवर केंद्रित झाले आहे. वसुंधरा यांनी राजस्थानमधून जास्तीत जास्त जागा निवडून देण्याचे स्वप्न बाळगले आहे. या सहा जागा त्यांचे स्वप्न भंग करू शकतात. राज्यात वाईट अवस्थेत असलेल्या कॉँग्र्रेसलाही या जागांतून ताकद मिळेल याची जाणीव आहे. येथे पक्ष नव्हे तर बंडखोर, बाहेरचा उमेदवार आणि जातीय राजकारणातील प्रतिनिधी निवडणूक लढत आहेत. या वेळी स्थानिक मुद्दे वरचढ ठरतील की मोदी लाट हे लवकरच कळून येईल.

राजस्थानच्या 25 लोकसभा जागांमध्ये कॉँग्रेस केवळ सहा ठिकाणी संघर्षाच्या स्थितीत असेल तर त्याची कारणेही आहेत. मोदी लाट आणि वसुंधराराजे यांचा सामना करण्यासाठी राज्यात कॉँग्रेसकडे कोणताच मोठा नेता नाही, या मताशी सहमत नसण्याचे कारण नाही. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट सक्रिय आहेत. मात्र, ते स्वत: अजमेर मतदारसंघातून लढत आहेत. परिणाम अन्य जागांवरील त्यांचा प्रचार मर्यादित झाला आहे. केंद्रात मंत्री राहिलेले राज्यातील अन्य मंत्री आपापल्या मतदारसंघात गुंतले आहेत. स्थानिक नेते अशोक गहलोत यांना ऐन निवडणुकीत गुजरातला पाठवले आहे.

बाडमेर हॉट सीट आहे. येथे माजी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह अपक्ष निवडणूक लढत आहेत. कॉँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कर्नल सोनाराम आणि कॉँग्रेसच्या हरीश चौधरीशी त्यांचा सामना आहे. भाजपसोबत कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या जागेबाबत गोंधळ आहे. बाडमेरमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सभेच्या तारखा वेळोवेळी बदलल्या आहेत.

दुसर्‍या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर 25 जागांवरील चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक जिंकण्याची एवढी घाई आहे की असंतुष्टांचे मन वळवण्याचे डावपेच करणे लांब साधे राजकीय सौदार्ह दाखवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. कॉँग्रेस अनिश्चितेच्या संकटात अडकली आहे. राज्यात मोदी लाट नाहीच असे कॉँग्रेसला वाटते. भाजपच्या नेतृत्वाला राजकीय स्थितीचा अंदाज नाही असे म्हणत त्यांचे नेतृत्व स्वत:ला दिलासा देत आहे.
(लेखक राजस्थानचे स्टेट एडिटर आहेत)