आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत राजस्थानच्या सर्वात श्रीमंत महिला आमदार, काँग्रेस आणि भाजपासाठी बनत आहेत डोकेदुखी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर - 7 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यावेळी श्रीगंगानगर विधानसभा जागेच्या उमेदवार कामिनी जिंदल चर्चेमध्ये आहेत. कारण त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 287 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. 30 वर्षीय कामिनी राजस्थानच्या सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 2013 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि विरोधकाचा विक्रमी मतांनी पराभव केला होता. अशातच कामिनी भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. यावेळी 22 उमेदवार श्रीगंगानगर विधानसभा जागेवर आपले नशीब आजमावत आहेत. 

 

62 वर्षांच्या इतिहातील पहिल्या महिला आमदार

> कामिनी श्रीगंगानगरच्या पहिल्या महिला आमदार आहेत. त्या National Unionist Zamindara पक्षाच्या उमेदवार आहेत. 

> 2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि याठिकाणी इतिहासातील सर्वाधिक 37,068 मतांनी निवडणूक जिंकण्याचा विक्रम नावे केला. त्यांनी भाजपा उमेदवार राधेशाम यांचा पराभव केला होता. 

> येथील 62 वर्षाच्या इतिहातील पहिल्या महिला आमदार आहेत. राजस्थानमधील 199 आमदारांपैकी त्या सर्वात तरुण आमदार आहेत.

> 2011 मध्ये कामिनी यांनी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातून समाजशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यानंतर वडिल बी.डी. अग्रवाल यांनी जमिंदारा पार्टीमध्ये सहभाग घेतला. त्यांचे पती गगनदीप सिंग एका IPS ऑफीसर आहेत.  

 

निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार 

एकूण संपत्ती : 287.96 कोटी रूपये ( मागील 5 वर्षांमध्ये संपत्तीत 93 कोटी रूपयांची वाढ)
सोने : 2 किलो 535 ग्रॅम 
चांदी : 23 किलो
रोख रक्कम : 3.10 लाख रूपये

 

21 उमेदवारांसोबत आहे सामना

श्रीगंगानगर विधानसभा जागेसाठी एकूण 22 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसकडून अशोक चांडक तर भाजपातर्फे विनिता आहुजा मैदानात उतरले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...