आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Girl Kidnapped And Raped In Moving Car, Culprits Arrested In Police Chase

जयपूरमध्ये अपहरण, 141 किमी पर्यंत धावत्या कारमध्ये गँगरेप; Video बनवला, पोलिसांनी पाठलाग करून केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या जयपूर महामार्गावर एका 20 वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाला आहे. आरोपी युवकांनी तरुणीचे जयपूर येथून अपहरण केले तसेच गंगापूर जिल्ह्यापर्यंत नेले. या 141 किमी प्रवासात तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला. तिच्यावर आळी-पाळीने अत्याचार करताना नराधमांनी व्हिडिओ देखील बनवला. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग करून नराधमांना पकडले आहे. 


पोलिस स्टेशनची इमारत दिसताच ओरडली पीडित...
जयपूरहून निघालेले नराधम त्या तरुणीला गंगापूरपर्यंत नेत होते. गंगापूर सिटीमध्ये पोहचताना पीडितेला कारमधून पोलिस स्टेशनची इमारत दिसली. इमारत दिसताच तरुणीने संपूर्ण ताकदीने ओरडून मदत मागितली. इमारतीपर्यंत तिचा आवाज पोहोचू शकला नाही. परंतु, त्याच इमारतीसमोर असलेल्या एका दुकानदाराला प्रकरण लक्षात आले. त्याने वेळीच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर त्या कारचा पाठलाग करून त्या नराधमांना अटक करण्यात आली. आरोपींची नावे अभयराज आणि चरतलाल अशी असून हे दोघे गंगापूरच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. 


तरुणीच्या शरीरावर जखमाच-जखमा...
दोन्ही नराधमांनी जयपूरच्या एका परिसरातून तरुणीला बळजबरी कारमध्ये बसवले. यानंतर तिचे अपहरण करून तिला 141 किमी दूर नेताना आळी-पाळीने बलात्कार केला. पीडित तरुणीने विरोध केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या चेहऱ्यावर नराधमांच्या नखांच्या खुणा आहेत. सोबतच संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. तिला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. क्रूरक्रर्मांनी संपूर्ण रस्त्यामध्ये तिचा व्हिडिओ देखील बनवला आहे.


कार पलटली तेव्हा पकडले गेले नराधम
पोलिसांची गाडी आपला पाठलाग करत असल्याचे पाहता आरोपींनी कार सुसाट पळवली. त्यांनी हबीबपूर, नौगाव आणि बामन बडौदा रस्त्यावर पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. बामन बडौदा वळणावर पोलिस आणि आरोपींचा सामना झाला. त्यावेळी आरोपींनी भरधाव कारचा अचानक ब्रेक दाबला आणि कार वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान कार पलटली आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...