Home | Sports | From The Field | Rajasthan Royals win in new captaincy

नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात राजस्थानचा राॅयल विजय; मुंबई इंडियन्सवर सलग चाैथ्यांदा मात

वृत्तसंस्था | Update - Apr 21, 2019, 09:58 AM IST

राजस्थानची मुंबईवर ५ गड्यांनी मात; कर्णधार स्मिथचे नाबाद अर्धशतक

  • Rajasthan Royals win in new captaincy

    जयपूर - सलगच्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी राजस्थान राॅयल्स संघाने नेतृत्वात खांदेपालट केली. याच नेतृत्वातील बदलाने राजस्थानला अायपीएलच्या १२ व्या सत्रातील नवव्या सामन्यात विजयाची पताका फडकावता अाली. राजस्थानने घरच्या मैदानावर शनिवारी तीन वेळच्या चॅम्पियन मुुंबई इंडियन्सचा ५ गड्यांनी पराभव केला. राजस्थानविरुद्ध मुंबईचा सलग चाैथा पराभव झाला.


    मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.१ षटकांत पाच गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. कर्णधार स्मिथने (६५) नाबाद अर्धशतकी खेळी करून संघासाठी विजयश्री खेचून अाणली. यासाठी त्याला युवा फलंदाज रियान परागची (४३) माेलाची साथ मिळाली. त्यांनी टीमच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर केला. दरम्यान, अर्धशतकाच्या वाटेवर असलेला पराग हा धावबाद झाला. त्यामुळे त्याला २९ चेंडूंत पाच चाैकार अणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी करता आली.

    स्मिथचे सातवे अर्धशतक :
    राजस्थान संघाचा नवा कर्णधार स्मिथ सामन्यात चमकला. त्याने कुशल नेतृत्वासह झंझावाती खेळी केली. त्यामुळे त्याला संघाला विजयी ट्रॅकवर आणता आले. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ५९ धावा काढल्या. यात पाच चाैकार आणि एका षटकारांचा समावेश आहे. यासह त्याने संघाचा विजय नाेंदवला.

Trending