आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात शिक्षकांची ऑनलाइन लागणार हजेरी, परंतु...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेधपूर : राजस्थानातील ६८ हजार शाळांमधील सुमारे २.८७ लाख शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना आता मोबाइलवर हजेरी लावावी लागणार आहे. यासाठी शाला दर्पण पोर्टल तयार करण्यात आले अाहे. सरकारच्या या आदेशाचा फटका दुर्गम भागातील शिक्षकांना बसला आहे. अनेक गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने त्यांना अर्धा किमी दूर वाळूच्या टेकड्या अथवा छतावर जाऊन हजेरी द्यावी लागत आहे. सकाळी १०.३० वाजता हजेरी लागली नाही तर कर्मचाऱ्यास अनुपस्थित दर्शवून त्यांचा पगार कापण्यात येत आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रेमचंद साखला यांनी सांगितले, अनेक गावातील शिक्षकांनी या समस्येवर चर्चा करणार असल्याचे सांगितले.

  • गावात उपलब्ध नसते नेटवर्क; शाळेपासून दूर वाळूच्या टेकड्या अथवा छतावर देतात हजेरी

केस 1 : एक किमीपर्यंत नेटवर्क नसते ५० फूट उंच टेकडीवर जातात शिक्षक

हे दृश्य शासकीय प्राथमिक विद्यालय, धोकलनगर बुगडीचे आहे. चोहोबाजूने वाळूच्या टेकड्या असून मध्यभागी शाळा आहे. येथे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे रोहिताशसह सर्व चारही शिक्षक अर्धा किमी दूर अंतरावरील वाळूच्या टेकडीवर जाऊन ऑनलाइन हजेरी लावतात. अनेकदा तेथे नेटवर्क नसल्याने गैरहजेरीही लागते.

केस 2 : गैरहजेरी टाळण्यासाठी छतावर जाऊन शिक्षकांना शोधावे लागते नेटवर्क

शासकीय प्राथमिक शाळा माताजी की डोली राेहिणा येथेही नेटवर्क नाही. शिक्षकांना छतावर जाऊन नेटवर्क पाहावे लागते. अथवा अर्धा िकमी दूर अंतरावरील टेकडीवर जाऊन हजेरी द्यावी लागते. या संस्थेचे अध्यक्ष रामकिशोर मीणा यांनी सांगितले, छतावरही नेटवर्क राहतेच असे नाही.

 

बातम्या आणखी आहेत...