Home | National | Other State | rajasthan village people birth date 1 january

बेढावल गावच्या प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारीला

दिव्य मराठी | Update - Mar 11, 2019, 12:18 PM IST

राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यात बेढावल नावाचे आदिवासी गाव आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचा जन्म १ जानेवारीला झाल्याची नोंद आ

  • rajasthan village people birth date 1 january

    उदयपूर - राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यात बेढावल नावाचे आदिवासी गाव आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचा जन्म १ जानेवारीला झाल्याची नोंद आढळते. मग तो ७६ वर्षांचा पदिया मीणा नावाचा वृद्ध असो की, १५ वर्षांचा धुलीलाल मीणा असो. त्यांच्या वयात भलेही ६१ वर्षांचे अंतर असेल, पण दोघांचीही जन्मतारीख १ जानेवारी आहे. हा काही योगायोग नाही, तर ३ हजार लोकवस्तीच्या या गावातील लोकांच्या आधार कार्डावर १ जानेवारी जन्म दिनांक लिहिलेला आढळतो. गावातील नारायण मीणा यांनी सांगितले, त्यांचा जन्म ५ जुलै १९८८ रोजीचा आहे. पण आधार कार्डावर माझी जन्मतारीख १ जानेवारीच नोंदलेली आहे. आधार कार्ड तयार करणाऱ्या एका संस्थेची चूक आहे की ऑपरेटरची अथवा गावकऱ्यांनीच चुकीची माहिती दिलेली आहे काय? याची चौकशी माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार आहे.


    उदयपूरच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक शीतल अग्रवाल यांनी सांगितले, आधार कार्डावर जन्म दिनांक नोंदवण्यासाठी योग्य पुरावा हवा असतो. तोच नसल्याने राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र हवे असते. त्यावर त्यांनी जन्मतारखेचा उल्लेख केलेला असतो, परंतु काही कार्डावर अशी तारीख असू शकते. कारण अशा व्यक्तींना आपली जन्मतारीख माहिती नसते. परंतु गावातील सर्वच व्यक्तींची जन्मतारीख एकच असणे हे खूप आश्चर्यजनक आहे. गावातील तरुणांनी सांगितले, आमच्या गावात १ जानेवारी हा दिवस एखाद्या सणाप्रमाणेच असतो. गावातील वृद्ध मंडळी अथवा मोठी माणसे आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. पण आम्ही सर्व तरुण व लहान मुलांचा वाढदिवस जोरात साजरा करतो. गावातील मोठ्या माणसांना वाढदिवस म्हणजे काय हे माहिती नाही.

Trending