Home | National | Other State | Rajasthan woman dead body found in allege dowry case, probe continues

रात्री फोन करून सांगितले, सासरचे लोक खूप मारहाण करत आहेत, 2 लाख दिले नाही तर मारून टाकतील! सकाळी सापडला मृतदेह

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 17, 2019, 02:32 PM IST

हुंडाबळीत हत्येला आत्महत्येचे स्वरुप दिल्याचा वडिलांचा आरोप

 • Rajasthan woman dead body found in allege dowry case, probe continues

  जयपूर - राजस्थानच्या पाली शहरातील एका घरात 22 वर्षीय विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सासरच्या मंडळीची चौकशी केली. त्यांच्या मते, या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह फासावर लटकलेला होता. त्याच दरम्यान वडिलांनी आपल्या मुलीचा खून झाला असून तिला सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिल्याचे आरोप केले. एवढेच नव्हे, तर मृत्यूच्या अवघ्या काही तासांपूर्वी रात्री तिने रडता-रडता आपली परिस्थिती मांडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह सापडला. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.


  2016 मध्ये थाटात झाला होता विवाह
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नाव प्रियंका असून ती मूळची जोधपूर येथील रहिवासी होती. तिचे वडील गौतमचंद रेगर यांनी 24 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा विवाह पाली येथे राहणाऱ्या प्रकाश नवल यांचा मुलगा चिमनलालशी केला होता. चिमनलालचे एक संगणक स्टोअर होते. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी आपल्या ऐफतीपेक्षा जास्त खर्च केला होता. परंतु, लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या सासू-सासऱ्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. तिले मारहाणही केली जायची. परंतु, आपल्या वडिलांच्या परिस्थितीचा विचार करून ती शांतपणे हा अत्याचार सहन करत होती.


  मृत्यूच्या अदल्या रात्री आला होता फोन...
  वडील गौतमचंद यांनी सांगितले, की सोमवारीच रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्यांना प्रियंकाने कॉल केला होता. यावेळी तिने आपल्याला सासरच्या मंडळीकडून मारहाण होत असल्याचे सांगितले. 2 लाख रुपये आणि बाइकची मागणी केली जात आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त हे लोक मला मारून टाकतील. असेही मुलीने रडता-रडता सांगितले होते. मजबूर बापाने मुलीची समजूत काढली आणि त्यानंतर कॉल कट झाला. दुसऱ्या दिवशी अर्थात सकाळी 6.30 च्या सुमारास मुलीच्या काकांनी मुलीच्या वडिलांना कॉल केला. तसेच मुलगी प्रियंकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.


  घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गौतमचंद यांना बोलावून घेतले. तसेच त्यांच्या उपस्थितीत प्रियंकाच्या मृतदेहाची रुग्णालयात रवानगी केली. शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह जोधपूरला नेण्यात आला. त्याच ठिकाणी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षांची चौकशी करून सविस्तर तपास सुरू केला आहे.

Trending