आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावची परंपरा कायम ठेवण्यासाठी मोबाइल व सोशल मीडिया सोडून मोठ्यांसोबत कुस्तीचे सर्व डावपेच शिकतात 350 मुले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलवाडा - राजस्थानातील भिलवाडाजवळील पुरगावात ३५० मुले मोबाइल व सोशल मीडियाचा नाद सोडून कुस्तीचे डावपेच शिकत आहेत. गावात गेल्या ८० वर्षांपासून चालत आलेली कुस्तीची परंपरा कायम राखण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. गावात चार आखाडे आहेत. येथे लहान मुले, तरुण व मोठी माणसे मिळून कुस्ती खेळतात. कंवरीलाल बिश्नोई (७५) मुलांना कुस्ती शिकवतात. त्यांची शिव व्यायामशाळा आहे. कंवरीलाल सांगतात, अाखाड्यात ६ पासून १५ वर्षंापर्यंतचे पहिलवान आहेत. आखाड्यात सकाळी व संध्याकाळी रोज २ ते ३ तास कुस्ती शिकवली जाते. 

 

आखाड्यातील सर्वात लहान पहिलवान ६ वर्षांचा 
कंवरीलाल सांगतात, आखाड्यातील सर्वात लहान पहिलवान फक्त ६ वर्षे वयाचा आहे. गावात लोकांमध्ये कुस्तीबद्दल इतके वेड आहे की, निम्म्या घरांत एक पहिलवान आहे. 

 

३०० पहिलवानांनी जिंकली राज्यस्तरीय-राष्ट्रीय पदके 
गावात आजवर १०० हून अधिक पहिलवानांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व ब्राँझ पदके जिंकली आहेत. राज्य स्तरावर २०० पहिलवान खेळले आहेत. बिश्नोई सांगतात, गेल्या वर्षी व्यायामशाळेतील ९ पहिलवानांना शालेय व खुल्या स्पर्धेत ९ राष्ट्रीय पदके मिळाली आहेत. 
अाखाड्यात आता मुलीसुद्धा : व्यायामशाळेचे कोच कल्याण बिश्नोई यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून मुलीसुद्धा आखाड्यात येतात. एका मुलीपासून हळूहळू सुरुवात होऊन सुमारे २० मुली येथे कुस्तीचे डावपेच शिकतात. सकाळी व सायंकाळी त्याही येथे सराव करतात. 

बातम्या आणखी आहेत...