आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयासाठी मोदींनी यांना आभारपत्रं पाठवायलाच हवीत!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधींनंतर दोन निवडणुकांमध्ये  बहुमत मिळवून सरकार स्थापन करणारे नरेंद्र मोदी पहिले नेते आहेत. या ऐतिहासिक विजयाप्रसंगी ज्यांनी हा शानदार राजकीय विजय मिळवला अशा काही लोकांना पत्र पाठवून आभार व्यक्त केले पाहिजेत.


अमित शहा : गेल्या पाच वर्षांत ९१ वेळेस बंगालला गेल्याचा शहा यांचा दावा आहे. त्यांनीच बिहार व महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यांत युती घडवून आणली. ‘साम, दाम, दंड, भेद’च्या त्यांच्या निष्ठूर शैलीत अनेकदा मूलभूत शिष्टाचार (बांगलादेशी अप्रवासींना वाळवी म्हटले होते.) ही नैतिकता (ते भाजप सोशल मीडियाच्या योद्ध्यांना ‘फर्जी खबरें’ पसरवण्याचे आव्हान करत राहिले) देखील दिसली नाही. मात्र, त्यांच्यात कधीच कट्टर स्पर्धेच्या भावनेची उणीव दिसली नाही, ज्याने निवडणूक जिंकता येते. 


काँग्रेस : नरेंद्र मोदी सरकार यांचा संभाव्य पराभव कधी दमदार ‘सुनमो’ मध्ये बदलला? आता असे म्हणायला आश्चर्य वाटते की,  डिसेंबर २०१८ मध्ये काँग्रेसचा विजय निर्णायक वळण होते. काँग्रेसला वाटले मोदी-शहा-आरएसएसच्या अजेय मशीनच्या पराभवाचा फॉर्म्युला भेटला. हे मोदींच्या विरोधात नव्हे, तर भाजप सरकारच्या विरोधात मत होते.  त्यांच्याकडे स्वत:चा प्रभाव वाढवणे किंवा राजकीय युतीने मोदी फॅक्टरला कमी करण्याचा पर्याय होता. त्यांनी चुकीची निवड केली. भाजपने धडा घेत शेतकरी सन्मान आणि आर्थिक रूपाने वंचितांना आरक्षण देऊन प्रमुख मतदारांना वळवले.


राहुल गांधी : काँग्रेस अध्यक्षांनी पूर्ण अभियान चालवले. मात्र, सुसंगत रणनीती नव्हती. राफेल ते नोटबंदी आणि जीएसटीपर्यंत काँग्रेस नेतृत्व मोदींना अडकवण्यासाठी मुद्दे शोधत राहिले. मात्र, स्वत:चे कोणतेच विश्वसनीय मुद्दे मांडू शकले नाहीत. अखेर आपले व्हिजन सांगण्यासाठी ते  ‘न्याय’ घेऊन आले तरीदेखील लोकांना आकर्षित करू शकले नाहीत.


प्रादेशिक विरोधी पक्ष : ममता ते मायावती व चंद्राबाबू नायडूपर्यंत मोदी विरोधाचे वेड विरोधकांचा ट्रेडमार्क  राहिला. आंतरिक विरोधाभास इतके जास्त होते की, मोदींना हटवण्याचे व्हिजन अवघड होते. त्यामुळे १९७७ सारखे ‘महागठबंधन’ खरंच कधी हाेऊ शकले नाही. त्यामुळे एकट्या ‘मजबूत’ नेत्याची केमिस्ट्री, ‘महा-मिलावट’ युतीच्या गणितावर भारी पडली.