आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - काँग्रेसमधून अनेक दिग्गज बाहेर पडत असतानाच अचानकपणे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी पक्षाच्या प्रसारमाध्यम संपर्क समिती प्रमुखाचा राजीनामा दिला. त्यामुळे तेही भाजपत जाणार असल्याच्या चर्चा साेशल मीडियातून सुरू झाल्या. मात्र आपण फक्त समितीचा राजीनामा दिला असून पक्षाचा नव्हे, असे स्पष्टीकरण दर्डा यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पराभूत झाल्यापासून दर्डा काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नव्हते.
पद सांभाळण्यास असमर्थ
दर्डा म्हणाले,‘प्रसारमाध्यम संपर्क समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे हाेती. मात्र वैयक्तिक अडचणींमुळे मी जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ होतो. पदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षाला १५ जुलैलाच कळवले होते. मी पक्षात कायम आहे. इतर ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.