आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन विमा हवाच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीच नव्हे, तर चारचाकी चालवणाऱ्या महिलांचीही संख्या वाढते आहे. मात्र, वाहन विमा, त्यांची सुरक्षितता यासंदर्भात त्या अनभिज्ञ असतात. वाहन कुठलंही असलं तरी त्याबद्दल सर्व जागरूकता असणं आणि माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यादृष्टीनं वाहन विम्याबद्दल माहिती सांगणारा लेख.

 

पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून वाहन घेणारे विमा काढतात. पण हे आपल्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचं आहे. देशात नोंदणीकृत मोटार वाहनांची संख्या २५ कोटीपेक्षा जास्त आहे यामध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकी वाहनांची आहे. वाहनांचा थर्ड पार्टी विमा हा अनिवार्य आहे. मात्र गरजेचं असूनही ६० टक्क्यांहून अधिक वाहनं ही विमा न काढता रस्त्यावर फिरत आहेत. हा विमा वाहन, मालक, चालक आणि तिसऱ्या पक्षाच्या हितासाठी आवश्यक आहे. 

 

का महत्त्वाचा आहे मोटार विमा
हे कायदेशीररीत्या गरजेचं तर आहेच. शिवाय, मोटर वाहन अधिनियमांंनुसार कोणताही वाहन मालक, त्यांचं स्वत:चं वाहन ते स्वत: किंवा इतर कुणाद्वारे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तोपर्यंत वापरू शकत नाही जोपर्यंत त्या वाहनाचा थर्ड पार्टी विमा काढलेला नसेल. यामुळेच आजच्या काळात वाहन विम्याचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही.

बातम्या आणखी आहेत...