आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरमध्‍ये जातप्रमाणपत्रासाठी लाच मागितली, ACBकडून अव्वल कारकूनास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जळगाव) - प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र वाडे यांना जातप्रमाणपत्रासाठी लाच मागितल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आज (शुक्रवारी) ही कारवाई करण्‍यात आली.

 

याप्रकरणी अमळनेर पोलिसांत 23 मे रोजी संदीप हिलाल ठाकूर (31, रा. तासखेडा, ता. अमळनेर) यांनी तक्रार दिली होती. मुलाचे ठाकूर समाजाचे जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्‍वल कारकून राजेंद्र वाडे (वय-50, रा. आंबेडकर नगर, ता. चोपड़ा) याने पंचासमक्ष 8,000 हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार संदीप ठाकूर यांनी केली होती.

 

याची दखल घेत पोलिस निरीक्षक निता कायटे यांनी सापळा रचत वाडे यांना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा लावण्यात आला. यापूर्वी प्रांताधिकारी संजय गायकवाड याच्यांच कार्यालयात संजय पाटील नामक कर्मचाऱ्याला लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्यानंतर या दुसरा कर्म-याला लाचप्रकरणी अटक करण्‍यात आली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...