आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajesh Khanna 76th Birth Anniversary Rajesh Khanna Tina Munim Lesser Know Life Facts

विवाहित असताना टीना मुनीमच्या प्रेमात आकंठ बुडाले होते राजेश खन्ना, लिव्ह इनमध्ये होते दोघे, वापरायचे एकच टुथब्रश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज (29 डिसेंबर) 76 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. 1966 मध्ये दिग्दर्शक चेतन आनंदच्या 'आखिरी खत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या राजेश खन्ना यांनी सुमारे 180 चित्रपटांमध्ये अभिनय केला. अभिनयाव्यतिरिक्त ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले.  डिंपल कपाडियाबरोबर लग्न केल्यानंतरही राजेश खन्ना टीना मुनीम यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. राजेश खन्ना यांनी डिंपला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करावे अशी टीना मुनीमची इच्छा होती. राजेश खन्नांनी तिला लवकरच डिंपलला घटस्फोट देणार असल्याचे आश्वासनही दिले होते. पण अनेक दिवस लोटल्यानंतरही तसे झाले नाही, त्यामुळे टीनाने राजेश खन्नांपासून लांब राहणे सुरू केले. असे सांगितले जाते की, टीना जेव्हा राजेश खन्ना यांना सोडून जाणार होती, तेव्हा राजेश यांनी ती जाऊ नये म्हणून तिच्या विनवण्या केल्या होत्या. पण टीनाने त्याचे ऐकले नाही.  एका मुलाखतीत राजेश खन्नांनी सांगितले होते की, ते आणि टीना एकच टुथब्रश वापरायचे. एवढे त्यांचे नाते घट्ट होते. 

 

टीना मुनीमने राजेश खन्नांवर टाकला होता दबाव... 
- राजेश खन्ना हे हिंदी सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते, आणि मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या असे म्हटले जाते. त्याच दरम्यान 70 च्या दशकात एका अॅक्ट्रेसने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचे नाव होते, टीना मुनीम. 1976 मध्ये देश परदेशमधून पदार्पण करणारी टीनाही राजेश खन्नांच्या प्रेमात पडली. 
- राजेश खन्ना आणि डिंपल यांचे लग्न झालेले होते तरी टीना मुनीमने राजेश खन्ना यांना स्वतःच्या जवळ येऊ दिले. टीनाला राजेश खन्नांचे स्टारडम आवडत होते आणि राजेश खन्नांना तिचे सौंदर्य. असे म्हटले जाते की, 80 च्या दशकात त्यांचे अफेयर सुरू असताना टीनाने राजेश खन्ना यांच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 

 

संपुष्टात आले नाते...

राजेश खन्ना यांनीही डिंपलला घटस्फोट देऊल लग्न करण्याचे आश्वासन टीनाला दिले. पण राजेश खन्ना डिंपलबरोबर कधीही घटस्फोटाबाबत बोलले नाही. अनेक वर्षे वेगळे राहूनही अखेरपर्यंत त्यांचा घटस्फोट झाला नाही. राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांनी 'फिफ्टी-फिफ्टी' (1981), 'सुराग' (1982), 'सौतन' (1983), 'अलग-अलग' (1985), 'आखिर क्यो' (1985), 'अधिकार' (1986) सह अनेक चित्रपट केले. दोघांचे नाते 1987 मध्ये संपुष्टात आले. 


1973 मध्ये केले होते डिंपलबरोबर लग्न 
राजेश खन्ना यांनी डिंपलबरोबर 1973 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दीड वर्षातच डिंपलने मुलगी ट्विंकलला डिसेंबर 1974 मध्ये जन्म दिला. राजेश-डिंपल यांनी काही काळ सोबत चांगला घालवला. पण नंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यात टीना राजेश खन्ना यांच्या जीवनात आली. दोघे चित्रपटांच्या आऊटडोअर शूटला एकत्र जाऊ लागले. त्यांच्यात जवळीकता वाढत होती. डिंपललाही हे माहिती होते. असे म्हटले जाते की, डिंपलने 1984 मध्ये राजेश खन्नाचे घर सोडले तेव्हा टीना राजेश खन्ना यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी त्यांच्या घरात शिफ्ट झाली होती. काही वर्षांतच हे नातेही संपुष्टात आले होते. 


एकामागून एक 15 सुपरहिट चित्रपट.. 
1962 मध्ये राजेश खन्ना यांनी अंधा युग नाटकात एका जखमी शिपायाची भूमिका केली होती. ते पाहून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी राजेश खन्ना यांना चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. 1965 मध्ये युनायटेड प्रोड्यूसर्स आणि फिल्मफेअर ने ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट आयेजित केली होती. त्यात 8 जण फायनल लिस्टमध्ये होते. त्या 8 पैकी एक होते, राजेश खन्ना. राजेश यांचा अभिनय पाहून डायरेक्टर चेतन आनंद यांनी त्यांना 1966 मध्ये आखिरी खत मध्ये लीड रोल दिला. त्यांनी 1969-72 दरम्यान सलग 15 सुपरहिट चित्रपटांत काम केले. 'सच्चा झूठा', 'इत्त्फाक', 'दो रास्ते', 'बंधन', 'डोली', 'सफर', 'कटी पतंग', 'आराधना', 'आन मिलो सजना', 'ट्रेन', 'आनंद', 'दुश्मन', 'महबूब की मेंहदी', 'खामोशी', 'हाथी मेरे साथी' हे ते चित्रपट होते. 
  

बातम्या आणखी आहेत...