आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतच्या नवीन फिल्मच्या रिलीजपुर्वी क्रेझी झाले फॅन्स, पोस्टर्ससोबत काढली रॅली, ढोल वाजवून केला डान्स, फटाक्यांची आतिशबाजीही, व्हायरल होतोय Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सुपरस्टार रजनीकांत यांचा पेट्टा चित्रपट 11 जानेवारीला रिलीज होत आहे. चित्रपटाच्या रिलीजपुर्वी चाहते क्रेझी झाले. सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये रजनी यांचे चाहते त्यांच्या पोस्टरसोबत रॅली काढत आहेत आणि ढोल वाजवून डान्स करत आहेत. तर एका व्हिडिओमध्ये चाहते आतिशबाजी करताना दिसत आहेत. चित्रपटगृहांबाहेर रजनीकांत यांचे मोठे-मोठे पोस्टर लागलेले आहेत आणि तिकीट घेण्यासाठी चाहते दोन दिवसांपुर्वीच रांगेत उभे आहेत. 

 

- ट्रेड एनालिस्ट्स मानतात की, हा चित्रपट पहिल्या दिवशी 15 ते 20 कोटींची कमाई करु शकतो.
- यापुर्वी रजनी यांच्या 2.0 चित्रपटाने बंपर कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर पेट्टा आणि अजीत या चित्रपटांची टक्कर आहे. दोन्हीही अॅक्शन फिल्म आहेत. 

बातम्या आणखी आहेत...