आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth And Kamal Haasan To Share Screen Together After 35 Years, Last Seen In Hindi Film 'Arrest'

35 वर्षांनंतर एकत्र स्क्रिन शेअर करणार रजनीकांत आणि कमल हासन, अखेरची 'गिरफ्तार'मध्ये एकत्र दिसली होती ही जोडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः सिने जगतातील दोन मेगास्टार रजनीकांत आणि कमल हासन तब्बल 35 वर्षांनंतर एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी एका चित्रपटासाठी दोघांना विचारणा केली असून त्यांच्याकडून दिग्दर्शकाला होकार मिळाला आहे. पण अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील काही महिन्यांत या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या कमल हासन त्यांच्या 'इंडियन 2' या चित्रपटात बिझी आहेत, तर रजनीकांत दिग्दर्शक सिवासोबत आपल्या पुढील प्रोजेक्टवर काम करत आहेत.  'गिरफ्तार' या चित्रपटात कमल हासन आणि रजनीकांत यांनी अखेरचे काम केले होते. त्याला आता 35 वर्षांचा काळ लोटला आहे. कॅथी या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी रजनी आणि कमल यांची भेट घेऊन चित्रपटाची कथा ऐकवली आहे. इतकेच नाही दोन्ही स्टार्सनी कथा वाचून चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. एकीकडे कमल 'इंडियन 2' या आगामी चित्रपटात बिझी आहेत. तर रजनी यांनी अलीकडेच  'दरबार' या चित्रपटाचे काम पूर्ण केले. 'दरबार' हा चित्रपट पुढील वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होईळ.  'गिरफ्तार' या चित्रपटात भारतीय सिनेसृष्टीतील तीन दिग्गजांनी एकत्र काम केले होते. कमल आणि रजनी यांच्यासह बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकले होते.

  • पुन्हा एकदा एकत्र काम करणार मुरुगदास आणि रजनी...

'दरबार' या तामिळ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर रजनी आणि दिग्दर्शक मुरुगदास पुन्हा एकदा एकत्र काम करु शकतात. मुरुगदास यांनी रजनी यांच्याकडे आणखी एका चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला असून रजनी यांचा होकारदेखील त्यांना मिळाला आहे. पण या नवीन प्रोजेक्टची तयारी 'दरबार'च्या यशावर अवलंबून आहे. 

  • रजनीकांत यांचे चाहते 70 दिवस साजरा करणार वाढदिवस...

सुपरस्टार रजनीकांत यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी 68 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी तब्बल 70 दिवसांच्या सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. मागील गुरुवारी त्यांच्या चाहत्यांनी मंदिरात रजनी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 2021 मध्ये रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनतील, अशी आशा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.