आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth Completes Shooting Of Upcoming Movie 'Darbar', Playing Role Of Police Officer After 28 Years

रजनीकांत यांनी पूर्ण केले आगामी चित्रपट 'दरबार' चे शूटिंग, तब्बल 28 वर्षांनंतर साकारत आहेत पोलिस ऑफिसरची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रजनीकांत यांनी आपला आगामी चित्रपट 'दरबार' चे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाची निर्माता कंपनी लीका प्रोडक्शंसने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. त्यांनी सेटवरून रजनीकांत यांचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, "आणि हे 'दरबार' साठी थलायवर (रजनीकांत) यांचे रॅपअप. पोंगलला दरबारची पाहात आहोत." स्पष्ट आहे की, हा चित्रपट पुढच्यावर्षी पोंगल सणाच्या दिवशी रिलीज होणार आहे.

28 वर्षांनंतर पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत रजनी... 
एआर मुरुगडॉसच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाद्वारे रजनीकांत 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत परतणार आहेत. यापूर्वी ते तमिळ चित्रपट 'पांडियन' मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसले होते, जो 1992 मध्ये रिलीज झाला होता. 'दरबार' चित्रपटाबद्दल बोलायचे तर या तमिळ चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा, प्रतीक बब्बर, निवेता थॉमस आणि योगी बाबू यांच्या मुख्य भूमिका आहेत.