Home | Gossip | rajinikanth dances so much in his daughter's wedding party

मुलीच्या वेडिंग पार्टीमध्ये स्वतःला नाचण्यापासून रोखू शकले नाही रजनीकांत, केला जबरदस्त डान्स, पाहुण्यांनीही टाळ्या वाजवून केले चीयर : VIDEO

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 12, 2019, 02:31 PM IST

रजनीकांतच्या धाकट्या मुलीने सोमवारी साउथ इंडियन अभिनेता विशागनसोबत केले दुसरे लग्न... 

  • rajinikanth dances so much in his daughter's wedding party

    एंटरटेन्मेंट डेस्क : सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रजनीकांत यांच्या धाकट्या मुलीच्या सौंदर्याच्या वेडिंग पार्टीचा आहे. 7 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये झालेल्या या फंक्शनमध्ये रजनीकांत यांचे अनेक आप्तस्वकीय आलेले होते. मुलीचे दुसऱ्यांदा लग्न झालेलं पाहून रजनीकांत स्वतःला नाचण्यापासून रोखू शकले नाही. त्यांनी खूप डान्स केला आणि तिथे उपस्थित सर्वानीच त्यांना टाळ्या वाजवून चीयर केले.

    सोमवारी सकाळी झाले सौंदर्याचे लग्न...
    सोमवारी सकाळी चेन्नईच्या 'द लीला होटल पैलेस' मध्ये सौंदर्याने साउथ इंडियन अभिनेता विशागन याच्यासोबत लग्न केले. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. सौंदर्याने याआधी बिजनेसमॅन अश्विन रामकुमार याच्यासोबत होते. दोघांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. 2017 मध्ये या कपलचा घटस्फोट झाला. तसेच विशागन यासायचे पहिले लग्न एका मॅगजीनची एडिटर कनिखा कुमारन हिच्यासोबत झाले होते. नंतर ते दोघेही वेगळे झाले.

Trending