आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या शपथविधीला येणार रजनीकांत, म्हणाले- 'जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधींप्रमाणे करिश्माई नेते आहेत मोदी'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- साउथचे सुपरस्टार रजनीकांत गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये या गोष्टीवर स्पष्टीकरण दिले आणि म्हणाले- 'जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्या नंतर मोदीच करिश्माई नेते आहेत आणि यावेळी लोकसभेत मिळालेला विजय खऱ्या अर्थाने मोदींचा विजय आहे.'


राहुल गांधींनी दिला सल्ला
रजनीकांत यांनी राहुल गांधी यांचा झालेल्या पराभवावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले- राहुल गांधी यांना आपले अध्यक्ष पत सोडले नाही पाहीजे, ते एक उत्कृष्ट नेते आहेत.

 

मोदींचे केले अभिनंदन
रजनीकांत यांनी मोदींना मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एक ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहीले- "डिअर नरेंद्र मोदीजी, तुमचे अभिनंतर, तुम्ही करून दाखवले, गॉड ब्लेस यू!"


कमल हासन यांनाही मिळाले आमंत्रण
रजनीकांत यांच्याशिवाय साउथ स्टार कमल हासन यांनाही मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले आहे. हासन यांनी मक्कल नीधी मय्यम पार्टीने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.