आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते रजनीकांत यांच्या घरात काम करायची या फॅनची आई, सुपरस्टारने बदलले आयुष्य, फॅनने स्वतः सांगितले का या सुपरस्टारला मानले जाते देव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांना साउथ इंडियामध्ये त्यांचे फॅन देव मानतात. कारण ते देखावा न करता परोपकार करतात. मागच्या दशकात त्यांनी अनेक गरजवंत लोकांची मदत केली. मग गोष्ट शिक्षणाची असो, उपचाराची असो किंवा इतर काही खर्चही असो. यातीलच एक आहे बॅनर डिजायनर माधी. तो रजनीकांतक  यांचे बॅनर्स बनवतो आणि रजनीकांत फॅन्स क्लबचे अनेक मेंबर्स माधीकडूनच बॅनर डिजाइन करून घेतात. एका इंटरव्यूदरम्यान माधीने रजनीकांत यांचबयासोबत आपल्या नात्याची कहाणी शेयर केली होती. 

 

रजनीकांत यांच्या घरी काम करत होती माधीची आई...
- माधीने इंटरव्यूमध्ये सांगितले, "माझे कुटुंब खूपच गरीब आहे आणि माझी आई रजनीकांत यांच्याघरी काम करत होती. माझे आजोबाही त्यांच्याकडे काम करायचे. ते कॉर्पोरेशन वर्कर होते आणि रजनीकांत आणि जयललिता यांच्या घराच्या आसपासचा एरिया साफ करण्याचे काम करायचे. कधी कधी ते रजनीकांत यांच्या घरातही काम करत. सकाळी सकाळी जेव्हा रजनीसर पेपर वाचायचे, तेव्हा माझ्या आजोबांशी ते बोलायचे. प्रत्येकवर्षी दिवाळीला आमचे कुटुंब त्यांच्या घरी जाते. रजनीसर आम्हाला नवीन कपडे आणि मिठाई देतात. त्यांनी माझ्या आजोबांना त्यांच्या कामासाठी पैसेही दिले आहेत". 

 

पाया पडणारे लोक रजनीकांत यांना आवडत नाहीत... 
- माधीने सांगितले की, रजनीकांत यांना ते लोक बिलकुल आवडत नाही जे त्यांच्या पाय पडतात. माधी, "एकदा पॉएस गार्डन येथे असलेल्या त्यांच्या घराबाहेर खूप गर्दी जमली. तेव्हा तिन्ही आजोबांना सांगितले की, ते त्यांच्या अद्यार येथील घरी येतील. ते आपली बेंज कारमधून आले. पांढरे धोतर आणि शर्ट  रजनीकांत जेव्हा गाडीतून खाई उतरले आणि येऊ लागले तेव्हा काही लोक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाय पडू लागले. पण रजनीसरांनी त्यांना यापुढे कधीही असे न करण्याची ताकीद दिली आहे. त्यांनी आम्हाला गर्दीत ओळखले आणि पुढे येण्यास सांगितले. मग त्यांनी विचारले, 'मला यायला उशीर तर नाही झाला'. ते खूप मोकळ्या मानाने आम्हाला भेटले, मिठाई वाटली आणि काही वेळेसाठी आम्हच्यासोबत गप्पाही मारल्या". 

 

रजनीकांत यांच्या पत्नीही आहेत मोठ्या मनाच्या...  
- माधीने आणखी एक घटना सांगितली, "एकदा आमची फॅमिली रजनीसरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली. तेव्हा रजनीसर घरी नव्हते तर वॉचमॅनने आम्हाला थांबवले आणि बाहेर वाट पाहण्यास सांगितले. लता अम्मा (रजनीकांत यांची पत्नी) यांना आम्ही आल्याची माहिती दिली गेली नव्हती. जेव्हा अचानक अम्मांची नजर आमच्यावर पडली, तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्ही बाहेर का वाट पाहत थांबले आहात' जेव्हा वॉचमॅनने त्यांना कारण सांगितले तेव्हा त्यांनी आमच्यासमोरच त्याला खूप सुनावले. त्यांनतर आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या घरात गेलो आणि लता अम्मानि नंतर आमच्यासोबत खूपवेळा गप्पा मारल्या. मी पूर्णवेळ स्माइल करत होतो. त्यांनी मला माझ्या शिक्षणाबद्दल विचारले" माधीने पुढे सांगितले, "रजनीसरांनी नेहमी आमची मदत केली. जेव्हा आम्ही स्ट्रगल करत होतो तेव्हाही, माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च त्यांनी केला. त्यामुळे मी केवळ एवढेच म्हणेन की, त्यांचे पोस्टर आण अबनार बनवण्यात मला आनंद होतो आणि त्याचा खूप गर्व होतो". रजनीकांत सध्या आपली नुकतीच रिलीज झालेली तामिळ फिल्म 'पेट्टा' मुळे चर्चेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...