आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth Said I Have Never Thought Of Post Of Chief Minister, I Only Want A Change In Politics

पक्ष न काढता रजनीकांत यांची राजकारणात एंट्री, म्हणाले- 'हीच बदलाची वेळ आहे, आता नाही तर कधीच नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मी कधीच मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहीले नाही, सध्या विना पक्ष काम करेल'
  • 'मला फक्त राजकारणात बदल घडवायचा आहे, हीच खरी योग्य वेळ आहे'

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतने राजकारणातील आपल्या एंट्रीबाबत गुरुवारी चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली नाही, पण भविष्यातील राजकारणाबाबतीत आपल्या योजना सांगितल्या. ते म्हणाले की, 'मी कधीच तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहीले नाही. मला फक्त राजकारणात बदल घडवायचा आहे.' आपल्या पक्षाबद्दल बोलताना म्हणाले की,'मी असा पक्ष काढणार आहे, ज्यात सरकार आणि पक्षप्रमुख वेगवेगळा असेल आणि कामही वेगवेगळं करतील.'


पुढे ते म्हणाले की, 'तामिळनाडूच्या राजकारणात दोन मोठे खेळाडू होते, एक जयललिता आणि दूसरे करुणानिधी. तमिळनाडूच्या जनतेने दोघांनाही मतदान केले. पण, आता त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात मोकळेपणा आला आहे.  आता यात बदल आणण्यासाठी आपल्याला एक नवीन आंदोलन छेडावे लागले. रजनीने 31 डिसेंबर 2017 मध्ये आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत राजकारणात एंट्री घेण्याची घोषणा केली होती.

रजनीकांतने 3 पॉइंटमध्ये आपल्या पक्षाचा कार्यक्रम सांगितला

1. त्यांनी सांगितले की, ते पक्षातील अशा पदांची भर्ती करणार नाहीत, जे निवडणूकीदरम्यान महत्वाचे असतात पण नंतर फक्त भ्रष्टाचाराला चालना देतात. कारण अशा पदांवर बसलेल्या लोकांना त्यांच्या कामाच्या बदल्यात टेंडर्स आमि कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. या अशा गोष्टींना बंद करावे लागेल.


2. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षात 60-65 तरुणांना संधी दिली जाईल. तसेच, उच्च शिक्षीत आणि चांगली प्रतिमा असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. इतर पदे माजी न्यायाधीश, माजी आयएएस अधिकारी आणि समाजात चांगली प्रतिमा असलेल्या नागरिकांनाच स्थान मिळेल.


3. त्यांनी सांगितल्यानुसार डीएमके आणि एआयएडीएमके यांच्याप्रमाणे सरकार आणि पक्षाचा प्रमुख एकच व्यक्ती नसेल. त्यांच्या पक्षात दोघांमध्ये समान अंतर असेल. तसेच, रजनी स्वतः सरकारच्या कामावर लक्ष ठेवतील पण त्यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...