तमिळनाडू / भाजप मला भगवामय करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी यात अडकणार नाही- रजनीकांत

'काही लोक आणि मीडिया मी भाजपचा असल्याचा दाखवत आहे' 

वृत्तसंस्था

Nov 08,2019 05:09:37 PM IST

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतने शुक्रवारी भाजपावर निशाना साधला. ते म्हणाले की, भाजप मला भगवामय करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी तमिळ कवी तिरुवल्लुवर यांच्यासोबतही असेच केले. पण, सत्य हे आहे की, तिरुवल्लुवर आणि मी त्यांच्या या जाळ्यात अडकणार नाहीत. यासोबत त्यांनी अयोध्या प्रकरणावर लोकांना न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखण्याची अपील केली.


अभिनेता कमल हासन आणि रजनीकांतने चेन्नईमध्ये शुक्रवारी राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या नवीन कार्यालयात दिवंगत चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. या दरम्यान रजनीकांत म्हणाले की, तिरुवल्लुवर यांना भगवे करण्याचा भाजपचा डाव आहे. मी पण भाजपचा आहे, असे काही लोक आण मीडिया सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी सांगितले की, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, किंवा त्यांची अशी इच्छा आहे, असे आम्ही कधीच बोल्लो नाहीत. भाजपला या सर्व गोष्टींमध्ये लक्ष देणार नाही.

आम्ही एकमेकांचा सन्मान करतोत- कमल हसन

कमल हासन म्हणाले की, कधीकाळी आम्हो दोघांनी एकमेंकाचा नेहमी सन्मान करणार, असे ठरवले होते. आम्ही असे मानतो की, आमच्यासाठी भविष्य खूप चांगले आहे. आजही आम्ही एकमेकांचा सन्मान, निंदा आणि समर्थन करतोत.


तिरुवल्लुवर यांच्या फोटोवरुन वाद झाला होता

काही दिवसांपूर्वी तमिळनाडुमधूल भाजपने तिरुवल्लुवर यांचा एक फोटो शेअर केला होता, ज्यावरुन खूप वाद झाला होता. फोटोमध्ये त्यांच्या मुर्तीला भगवे कपडे घातले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांनी त्यांच्या मुर्तीवर शेण फेकले होते, ज्यानंतर खूप वाद पेटला होता.

X
COMMENT