आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth Younger Daughter Soundarya Set To Get Married Second Time: Soundarya Secretly Engaged And Get Married In January With South Actor

रजनीकांतच्या मुलीने घटस्फोटित अभिनेत्यासोबत केला साखरपुडा, दीड महिन्यात थाटणार दुसरे लग्न, 5 वर्षांच्या मुलाची आहे सिंगल मदर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेते रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्या दुस-यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. बातम्यांनुसार, दाक्षिणात्य अभिनेता विशागनसोबत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सौंदर्या विवाहबद्ध होणार आहे. अलीकडेच एका खासगी समारंभात विशागनसोबत सौंदर्याचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमात फक्त कुटुंबातील लोक हजर होते. सौंदर्यासोबतच विशागनचेही हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न एका मॅगझिनची एडिटर असलेल्या कनिखा कुमारनसोबत झाले होते. पण काही दिवसांतच दोघे वेगळे झाले. तर सौंदर्याने 2010 मध्ये उद्योगपती अश्विनसोबत पहिले लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून तिला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. गेल्याचवर्षी त्यांचा घटस्फोट झाला होता. रजनीकांत यांनी त्यांच्या मुलीचे लग्न वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. 'कबाली'च्या रिलीजच्या काळात रजनीकांत यांनी यासंदर्भात मुलीसोबत बातचित करुन नाते सुधारण्यासाठी कॉम्प्रमाइज करण्यास सांगितले होते. पण सौंदर्या यासाठी तयार नव्हती. सौंदर्याने ट्वीट करुन पतीपासून विभक्त होत असल्याचे सांगितले होते.


सौंदर्याने अश्विनसोबत केले होते लव्ह मॅरेज... 
- सौंदर्या आणि अश्विन यांची लव्ह स्टोरी चेन्नईतील एका जिममधून सुरु झाली होती. 
- एकेदिवशी जिममधून बाहेर पडताना अश्विनने सौंदर्याला म्हटले होते, की तू रजनीकांत यांची मुलगी आहेस ना... मी त्यांचा मोठा चाहता आहे.
- यानंतर हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
- एक दिवस अश्विन सौंदर्याला त्याच ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. जिममध्ये अश्विनने सौंदर्याला लग्नाची मागणी घातली आणि दोघांचे लग्न झाले होते. 


कोण आहे रजनीकांतचे पुर्वाश्रमीचे जावई अश्विन...
- अश्विन चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपती आहे.  चेन्नईतील रिअल स्टेट टायकून रामकुमार यांचा तो मुलगा आहे. सध्या अश्विन केवीएस कन्स्ट्रक्शनच्या अध्यक्षपदी आहे. त्याने स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.
- अश्विनने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण चेन्नईतील एसआरएम कॉलेजमधून पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने फॅमिली बिझनेसमध्ये लक्ष घातले.

 

या चित्रपटांशी जुळली आहे सौंदर्या...
- 20 सप्टेंबर 1984 रोजी जन्मलेल्या सौंदर्याचे खरे नाव शकुबाई राव गायकवाड आहे. ती ग्राफिक डिझायनरसोबत निर्माती आणि दिग्दर्शिका आहे.
- 2014 मध्ये रिलीज झालेल्या रजनीकांत स्टारर 'कोचादाइयां' या चित्रपटाद्वारे तिने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 2010 मध्ये आलेला 'गोवा' या चित्रपटाची तिने निर्मिती केली होती. यापूर्वी तिने काही चित्रपटांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...