आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth's Daughter Saundariya Get Trolled Due To Enjoying Swimming Pool When Chennai Is In Big Water Problems

चेन्नईला जलसंकटाने घेरलेले असतांना स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या, युजर्स करत आहेत ट्रोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने अशातच सोशल मीडियावर आपला मुलगा वेदसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. हे फोटोज शेअर करून सौंदर्याने लिहिले होते, 'मुलांना लवकर शिकवावे म्हणजे पुढे ते स्वतः शिकण्यासाठी सक्षम होतात. स्विमिंग एक महत्वाची एक्टिविटी आहे.' पण या पोस्टमुळे सौंदर्या ट्रोल झाली.   

 

का झाले ट्रोलिंग ? 
ट्रोलर्सला, चेन्नईमध्ये पाण्याची एवढी विदारक परिस्थिती असताना सौंदर्याचे असे पूलमध्ये एन्जॉय करणे आवडले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यामुळे परेशान होऊन सौंदर्याने ट्विटरवरून फोटो हटवण्याची घोषणा करून एक पोस्ट लिहिली. तिने लिहिले, 'मी आपल्या ट्रॅव्हल डायरीजचे फोटोज चेन्नईमधील पाण्याची कमतरता पाहून हटवले आहेत. हे जुने फोटोज होते ज्यामध्ये माझा उद्देश मुलांना स्विमिंग शिकवण्याचा होता.'  

 

सौंदर्याचा जन्म 20 सप्टेंबर 1984 ला झाला होता. तिचे खरे नाव शकु बाई राव गायकवाड़ आहे. ती ग्राफिक डिजाइनर असण्याबरोबरच प्रोड्यूसर आणि डायरेक्टरदेखील आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला रजनीकांत स्टारर 'कोचादाइयां'द्वारे तिने डायरेक्शनमध्ये डेब्यू केला होता. 2010 मध्ये आलेला चित्रपट 'गोवा' ची ती प्रोड्यूसर होती. यापूर्वी सौंदर्याने अनेक चित्रपटांमध्ये ग्राफिक डिजायनर म्हणून काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...