Home | Gossip | Rajinikanth's daughter Soundarya shared a moment of her marriage with south actor vishgan

लग्नाच्या 65 दिवसानंतर रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने केला एक मोठा खुलासा, सांगितले, होणाऱ्या नवऱ्याने मध्येच का थांबवले होते लग्नाचे विधी  

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 11:38 AM IST

रजनीकांत यांच्या मुलीने ज्यांच्यासोबत केले दुसरे लग्न, तो आहे घटस्फोटित... 

 • Rajinikanth's daughter Soundarya shared a moment of her marriage with south actor vishgan

  एंटरटेनमेंट डेस्क : रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत हिने 11 फेब्रुवारीला बिजनेसमॅन आणि अभिनेता विशगन वांगामुड़ीसोबत लग्न केले. लग्नाचे विधी चेन्नईमध्ये झाले होते. सौंदर्या-विशगन यांच्या ग्रँड वेडिंगमध्ये अनेक सेलेब्स सामील झाले होते. लग्नाच्या 65 दिवसानंतर लग्नातील एक मजेदार किस्सा समोर आला आहे.

  - सौंदर्या आणि विशगनने लग्नानंतर आपला पहिला इंटरव्यू दिला. इंटरव्यूदरम्यान सौंदर्याने सांगितले, 'मुहूर्तम विधिदरम्यान मी खुप टेन्शनमध्ये होते. याचे कारण माझा मुलगा वेद, जो मंडपामध्ये माझ्यासोबत नव्हता. यादरम्यान विशगनने मला सपोर्ट केला. तो म्हणाला होता की, मी तोपर्यंत लग्न करणार नाही जोपर्यंत वेद येत नाही.'

  - सौंदर्याने सांगितले, 'विशगन वेदसाठी खूप प्रोटेक्टिव आहे. दोघांमधले बॉन्डिंगही चांगले आहे. वेद, विशागनसोबत सुरक्षित फील करतो आणि मला हेच हवे होते. आम्हाला हवे होते की, आमच्या मुलाने सर्वकाही पाहावे आणि समजून घ्यावे. एवढेच नाही, विशगनने वेदकडून माझ्याशी लग्न करण्याची परमिशनदेखील घेतली होती.' इंटरव्यूमध्ये सौंदर्याने हेदेखील प्रकर्षाने सांगितले की, घटस्फोट कुणाच्या आयुष्याचा शेवट नसतो दुसरे प्रेम मिळवणे योग्य आहे.

  5 वर्षांच्या मुलाची आई आहे सौंदर्या...
  सौंदर्याचा पती विशागन साउथ इंडियन फिल्मचा अभिनेता आहे. नोव्हेंबरमध्ये एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये सौंदर्याने विशागनसोबत साखरपुडा केला होता, ज्यामध्ये केवळ कुटुंबातील लोकच सामील झाले होते. सौंदर्यासारखेच विशागनचे देखील हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न एका मॅगझिनची एडिटर कनिखा कुमारनसोबत झाले होते. पण नंतर दोघेही वेगळे झाले होते. तर सौंदर्याने 2010 मध्ये बिजनेसमॅन अश्विन रामकुमारसोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघांचा एक पाच वर्षांचा मुलगा वेद आहे.

  या फिल्मचे काम पाहिले आहे सौंदर्याने...
  20 सप्टेंबर 1984 ला जन्मलेल्या सौंदर्याचे खरे नाव शकु बाई राव गायकवाड आहे. ती ग्राफिक डिजायनर असण्याबरोबरच प्रोड्यूसर आणि डायरेक्टरदेखील आहे. 2014 मध्ये रिलीज झालेली रजनीकांत स्टारर 'कोचादाइयां' द्वारे तिने डायरेक्शनमध्ये पाऊल टाकले. 2010 मध्ये आलेली फिल्म 'गोवा' ची ती प्रोड्यूस होती. यापूर्वीही अनेक फिल्ममधून सौंदर्या ग्राफिक डिजायनर म्हणून काम केले आहे.

Trending