आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी एस नलिनी 27 वर्षात दुसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर आली, मुलीच्या लग्नासाठी मिळाली 1 महिन्यांची पेरोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई(तमिळनाडू)- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली एस नलिनीला गुरुवारी एका महीन्यांच्या पेरोलवर वैल्लोर सेंट्रल जेलमधून बाहेर आणण्यात आले. नलिनी राजीव गांधी हत्येप्रकरणातील सात आरोपींपैकी एक आहे. याआधी ती मागील वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर तरुंगातून बाहेर आली होती. नलिनीने मुलीच्या लग्नासाठी सहा महिन्यांची पेरोल मागितली होती, पण मद्रास हायकोर्टने 5 जुलैला 30 दिवसांची पेरोल मंजुर केली. तिची मुलगी ब्रिटेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे.

 

मागील महिन्यात जस्टिस एमएम सुंदरेश आणि जस्टिस एम निर्मल कुमारच्या बँचने पेरोल अर्जावर सुनावणी केली होती. तमिळनाडू सरकारने म्हटले होते की, तिला एका वेळेस जास्तीत जास्त एका महिन्यांची पेरोल मंजूर झाली पाहीजे. नलिनीने सहा महिन्यांची पेरोल मागितली होती. 


नलिनीला इंटरव्ह्यू देण्याची परवानगी नाही
कोर्टाने नलिनीला बाहेर गेल्यानंतर कोणालाही इंटरव्ह्यू देणे आणि कोणत्याही राजकिय नेत्याला न भेटण्याचे आदेश दिले आहेत. तिला कडक सुरक्षेत कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. 25 जूनला कोर्टाने नलिनीच्या याचिकेवर सुनावणी केली होती.


1991 मध्ये झाली होती राजीव गांधीची हत्या
नलिनी वैल्लोरमध्ये 27 वर्षांपासून कैद आहे. तिच्या मुलीचाही तुरुंगातच जन्म झाला आहे. तिच्यासोबत इतर सहा आरोपीही कैद आहेत. यात तिचा पती मुरुगनदेखील सामील आहे. तमिळनाडुच्या श्रीपेरमबुदूरमध्ये एका निवडणुक रॅलीदरम्यान 21 मे 1991 मध्ये लिट्टेच्या आत्मघाती हल्यात माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झाली होती.


मृत्यूच्या शिक्षेला राज्य सरकारने जन्मठेपेत बदलले
एप्रिलमध्ये नलिनीने मद्रास हायकोर्टात आपले म्हणने मांडण्याची अपील केली होती. नलिनीला राजीव गांधी हत्याकांडात मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली होती, पण तमिलनाडु सरकारने 24 एप्रिल 2000 तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...