Home | Maharashtra | Mumbai | Rajkumar Hirani accused of sexual assault, filmmaker denies

#MeToo: चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप; पीडितेने केला धक्कादायक खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 11:12 AM IST

माझ्यावरील आरोप खोटे असून, फक्त प्रसिद्धीसाठी करण्यात आले आहे.

 • Rajkumar Hirani accused of sexual assault, filmmaker denies

  मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरू केलेल्या #MeToo चे वादळ थांबतच नाहीये. आता या वादळाचा फटका चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना बसला आहे. मुन्नाभाई MBBS, 3 इडियट्स, पीके आणि संजूसारखे सुपरहीट सिनेमे देणाऱ्या हिरानींवर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचे आरोप लावले आहेत. महिलेने राजकुमार हिरानी सोबत संजू (2017) चित्रपटाच्या टीममध्ये काम केल्याचा दावा केला आहे. तर हिरानी यांनी या सगळ्या आरोपांचे खंडन केले असून, हा फक्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे ते म्हणाले.

  मार्च ते सप्टेंबर 2018 दरम्यान झाले शोषण
  हफपोस्ट इंडिया वेबसाइटवर लिहीलेल्या आर्टिकलमध्ये महिलेने स्वत:ला हिरानींची असिस्टंट म्हणले आहे. महिलेने आरोप लावले की, हिरानी यांनी मागील वर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान लैंगिक शोषण केले. महिलेने राजकुमार हिरानींसोबत अनेक वर्षांपासून काम करत असलेले आणि संजू चित्रपटाचे सह-निर्माता विधू विनेद चोप्रा यांना ई-मेल पाठवला आहे. त्यात महिलेने म्हटले- एप्रिलमध्ये पहिल्यांदा हिरानी यांनी माझ्यावर अश्लील कमेंट केली आणि त्यानंतर लैंगिक शोषण केले.


  विधु विनोद चोपप्राला पाठवलेल्या ईमेलमध्ये महिलेने लिहीले, "सर, हे चुकीचे आहे. तुमच्याकडे खुप पॉवर आहे त्यामुळे मी काहिच करू शकत नाही. मी तुमच्यासमोर स्वत:ला सिद्ध नाही करू शकणार. हिरानी माझ्यासाठी वडिलांप्रमाणे होते. त्या रात्री आणि पुढील सहा महिन्यांसाठी माझा मेंदु, शरीर आणि मन सुन्न झाले." चोप्रा यांची पत्नी आणि चित्रपट समीक्षक अनुपमा, 'संजू'चे लेखक अभिजात जोशी आणि विधु विनोद चोप्रा यांची बहिण शैली यांनाही महिलेने ई-मेल पाठवला आहे.


  'माझ्याकडे पर्यात नव्हता'
  मी हिरानी यांच्या वर्तनापुढे काहिही करू शकले नाही. माझे वडील आजारी होते त्यामुळे मला कामाची गरज होती. मी काम सोडले असते आणि हीरानी यांनी सगळ्यांना मला काम देउ नका असे सांगितले असते तर मला कोणीच काम दिले नसते. त्यामुळे माझ्याकडे त्यांचे म्हणने ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. माझे काम जाऊ नये म्हणून मी सगळं सहन केलं. असे महिलेने सांगितले.

Trending