आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्ली चॅप्लिनच्या प्रवाहातील राजकुमार हिराणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार हिराणी यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान अभिनय करणार असल्याची चित्रपट उद्याेगात सध्या चर्चा आहे. परंतु आतापर्यंत कुणाकडून त्याला दुजाेरा मिळालेला नाही. राजकुमार हिराणी माध्यमांपासून लांब राहणे पसंत करतात. शाहरुख खानने पण आजकाल शांत राहणे पसंत केले आहे. ‘रईस’ आणि आनंद एल. राॅय यांच्या ‘झीराे’ चित्रपटाच्या अपयशानंतर ‘किंग खान’ला एका यशस्वी चित्रपटाची नितांत गरज आहे. त्याचे समकालीन आमिर खान आणि सलमान खानची फिल्मी दंगलीत आजही दबंगगिरी सुरू आहे. राजकुमार हिराणी यांनी आतापर्यंत बनवलेले सर्व चित्रपट यशस्वी ठरले आहेत. राजकुमार हिराणी यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपट दिग्दर्शनात विशेष गुणवत्ता मिळवल्यावर आपल्याला सहायक म्हणून घ्या, अशी विधू विनाेद चाेप्रा यांना विनंती केली. पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना राजकुमार हिराणी यांंनी एक पटकथा लिहिली हाेती, ज्यामध्ये त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि भीती अभिव्यक्त केली हाेती. या पटकथेमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवता येईल अशी रंजकता नाही, असे त्यांना वाटायचे. कारण पटकथा लेखन हे एखादा नट-बाेेल्ट कसण्याचे काम नाही तर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यात रंजकता असणे गरजेचे आहे. प्रेक्षक पसंतीचा विचार नेहमी चित्रपट निर्मात्यांच्या डाेक्यात घाेळत असताे. विधू विनाेद चाेप्रा यांच्याबराेबर काम करताना राजकुमार हिराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएसची पटकथा लिहिली आणि चाेप्रासाहेबांना एेकवली. ते लगेचच या चित्रपट निर्मितीसाठी तयार झाले. राजकुमार हिराणी आणि विधू विनाेद चाेप्रा यांनी शाहरुख खानला पटकथा एेकवली. शाहरुखने वेळ नसल्याचे साेयीस्कर कारण देऊन काम न करण्याचा निर्णय घेतला, परंतु आपल्या जवळच्या मित्रांना मात्र मुन्नाभाई चित्रपट नक्कीच यशस्वी हाेईल, असे सांगितले. परंतु विधू विनाेद चाेप्रा आणि त्याचे विचार जुळणारे नव्हते त्यामुळे चित्रपट निर्मितीच्या वेळी त्यांच्यात वाद निर्माण हाेऊ शकताे व त्यामुळे तरुण राजकुमार हिराणी यांचा चित्रपट रखडू शकताे यासाठी त्याने नकार दिला हाेता.  स्वत: राजकुमार हिराणी या गाेष्टीपासून अनभिज्ञ असतील की, मुन्नाभाईच्या आधी कितीतरी वर्षे किशाेरकुमार यांचा अभिनय असलेल्या चित्रपटात किशाेरकुमार एका रुग्णालयात धुतलेले कपडे घेऊन जातात आणि कधी-कधी तेथे पडलेला स्टेथास्काेप गंमत म्हणून गळ्याला लावतात. एक रुग्ण त्यांना डाॅक्टर समजताे व त्याच्या राेगावर उपचार करण्याची इच्छा व्यक्त करताे. हा एक हास्य चित्रपट हाेता.राजकुमार हिराणी यांना शिक्षणव्यवस्था व परीक्षा पद्धतीबद्दल चिंता वाटायची. तुम्हाला माहिती असेल की राजकुमार हिराणी यांच्या थ्री इडियट्समध्येही शैक्षणिक समस्यांवर प्रकाशझाेत टाकण्यात आला हाेता. त्यांच्या ‘पीके’ चित्रपटातही याच विषयाकडे लक्ष वेधले हाेते. तर चित्रपट निर्मितीचा प्रवाह चार्ली चॅप्लिनपासून सुरू हाेऊन राज कपूर आणि हृषीकेश मुखर्जींपर्यंत सुरू होता. चॅप्लिनमुळे प्रभावित झालेल्या चित्रपट निर्मात्यांमध्ये कुंदन शहा व अझीज मिर्झा यांची नावेही महत्त्वपूर्ण आहेत. राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान यांची जुगलबंदी रंजक हाेऊ शकते. शाहरुख खानलाही आपली राेमँटिक प्रतिमा पुसून सामान्य माणसाच्या संघर्षाचा अभिनय करून स्वत:ला नीट जाणून घेण्याची संधी मिळेल. त्याला अझीझ मिर्झा यांच्या सामान्यांच्या अर्थात चॅपलिनिस्क सिनेमाकडे वळावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...