आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajkumar Hirani On Sanju If We Had To Whitewash Anyone We Made Him Mahatma Gandhi

'संजू'विषयी बोलले राजकुमार हिरानी, टिकाकारांना या शब्दात दिले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: संजय दत्त यांच्या 'संजू' या बायोपिकने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. परंतू राजकुमार हिरानीने संजय दत्तची इमेज सुधारण्यासाठी हा चित्रपट बनवला अशी टिका केली जातेय. हा चित्रपट खरंच इमेज सुधारण्यासाठी बनवला का? या प्रश्नावर आता त्यांनी उत्तर दिले आहे. हिरानी म्हणाले - जर मला संजूची प्रतिमा सुधारायची असती तर त्याने केलेला क्राइम आणि ड्रग्सचे व्यसन दाखवले नसते. आम्ही चित्रपटात दाखवले की, त्याच्या जवळ गन होती, त्यांनी मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रात्रही घालवली होती. यामध्ये इमेज सुधारण्याचा संबंध कुठे आला. 'संजू'चे प्रदर्शन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले होते. या दरम्यान चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानीने मीडियासोबतब बातचित केली. संजयची इमेज सुधारण्यावर हिरानी म्हणाले की, व्हाइटवॉशिंग शब्द वापरुन हे प्रकरण उचवलून धरले जातेय. 

 

संजूने जे क्राइम केले ते आम्ही चित्रपटात दाखवले 
- मीडियासोबत बातचित करताना हिरानी यांनी सांगितले की, 'तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर सांगा त्याचा क्राइम काय आहे? त्याच्या जवळ गन होती, त्यांनी गन ठेवली होती हे आम्ही दाखवले. आम्ही दाखवले की, त्याला त्याच्या या चुकीसाठी पाच वर्षांची शिक्षा झाली. यामध्ये इमेज सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. जो क्राइम होता, तो आम्ही पुर्ण दाखवला.'
- हिरानी यांनी सांगितले की, 'आम्ही संजयच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू दाखवला. त्याच्या 308 गर्लफ्रेंड होत्या, त्याला ड्रग्सचे व्यसन होते. त्यांनी आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवली होती. यामध्ये व्हाइटवॉशिंग काय आहे? जर आम्हाला एखाद्याची इमेज सुधारायची असती, तर आम्ही त्याला महात्मा गांधी बनवून दाखवले असते.'

 

मीडियावर निशाणा साधलेला नाही 
'संजू' चित्रपटाचे को-रायटर अभिजीत जोशीने सांगितले - 'चित्रपटात मीडियाला निशाणा बनवले जात नाही. आम्ही मीडियाचा सन्मान करतो. चित्रपटात आम्ही ज्यांच्यावर निशाणा साधला आहे, ते चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. परंतू ते जेव्हा गोष्टींना सनसनी आणि चटपटीत बनवतात. त्याची आम्ही निंदा केली आहे.' ते म्हणाले की, -'जेव्हा आम्ही एखाद्या भ्रष्ट पोलिस अधिका-याला दाखवत असतो, याचा अर्थ असा होत नाही की, सर्व पोलिसवाले चुकीचे आहेत. '

 

 

बातम्या आणखी आहेत...