आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बधाई हो 2'मध्ये प्रथमच एकत्र काम करणार भूमी आणि राजकुमार, पाेलिस स्टेशनवर आधारित असेल कथानक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण, मुंबई : बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अधिकृतपणे निश्चित झाले की, राजकुमार रावचा आगामी चित्रपट ‘बधाई हो 2’ आहे. दैनिक भास्करला या चित्रपटाबाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. या चित्रपटात राजकुमार सोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे. हे दोघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. यापूर्वी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविचंद्रन शर्माने केले होते आणि आता हर्षवर्धन कुलकर्णी करणार आहे. त्याने यापूर्वी गुलशन देवय्या अभिनित ‘हंटर’ची निर्मिती केली आहे.

  • पाेलिस स्टेशनवर आधारित कथानक

चित्रपटाच्या मागील भागाचे कथानक एका वयस्कर महिलेच्या गरोदरपणावर आधािरत होते. आता यामध्ये बदल आहे. यामध्ये राजकुमार राव अशा एका पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षकाची भूमिका साकरतोय ज्या ठाण्यात हवालदारपासून ठाणेदार आणि कॉन्स्टेबल सर्व महिला आहेत. आणि त्या पोलिस स्टेशनचे नावदेखील महिला ठाणे आहे. भूमी यात एका तणावग्रसत पीटी शिक्षिकेची भूमिका साकरतेय. राजकुमार आणि भूमी एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि आपआपल्या भूमिकेची अदलाबदल करतात. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्यावर हा चित्रपट पुढे सरकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यात संबंध आणि त्यामध्ये दिलेल्या वचनांनाबाबत दाखविले जाणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी सुरुवातीलाच प्रदर्शित होईल.

  • ‘महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने मानधन मिळेल याची वाट पाहतेय’

भूमी म्हणाली, 'ज्या दिवशी अभिनेता आणि अभिनेत्रींना समान मानधन मिळेल. मी त्या दिवसाची वाट पाहतेय. भूमीने ‘दम लगा के हइशा’, ‘सांड की आंख’, ‘टॉयलेट’ यांसारख्या चित्रपटांत महिलांना मजबूत संदेश देणारे चित्रपट केले आहे. भूमीला समाजामध्ये होत असलेला सकारात्मक बदल जाणवतोय. यावेळी ती म्हणाली, सध्या परिस्थिती बदलते आहे, परंतु मला असे वाटते की अजून बदल गरजेचा आहे. फक्त चित्रपटाचेच नव्हे तर जगातील शक्तिशाली जागांवर महिलांना स्थान मिळालेले नाही. ती म्हणाली, ही खूप मोठी दरी आहे, परंतु हळूहळू ही कमी होईल. ज्या लाेकांसाेबत काम करतेय त्यात पुरुषदेखील महिला आणि पुरुषांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महिला-पुरुष दोघांनाही सारखे मानधन मिळेल याची मी वाट पाहतेय. या क्षेत्रात अभिनेता-अभिनेत्रीला सारखे मानधन मिळत नाही, हे योग्य नाही.’

बातम्या आणखी आहेत...