बॉलिवूड / राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा चित्रपट 'मेड इन चायना' चे पोस्टर आउट, ट्रेलरच्या रिलीज डेटचाही झाला खुलासा  

हा चित्रपट याचवर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे

Sep 17,2019 02:20:46 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा चित्रपट 'मेड इन चायना' चे पोस्टर पोस्टर रिलीज झाले आहे. मेकर्सने ट्रेलर रिलीजची तारीखदेखील सांगितली आहे. चित्रपटाचा ट्रेलर 18 सप्टेंबरला रिलीज केला जाईल. 'मेड इन चायना' चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये राजकुमार राव आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त बोमन ईरानी, परेश रावल, सुमित व्यास आणि गजराज राव असे चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार दिसत आहेत.

'मेड इन चायना' या चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसाले याने केले आहे. दिनेश विजन आणि जियो स्टूडियोज याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. 27 ऑक्टोबरला दिवाळी असल्याकारणाने हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज केला जाऊ शकतो. अद्याप मेकर्सने चित्रपटाच्या निश्चित रिलीज डेटची घोषणा केलेली नाही.

X