आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajkumar Rao Copied Look Of Director And Places Attached Eyebrows In 'Made In China', Gain 8kg Weigh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकुमार रावने दिग्दर्शकाला पाहून 'मेड इन चायना' चित्रपटात केला जोडलेल्या भुवयांचा लूक, वाढवले 8 किलो वजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : राजकुमार राव आपला अपकमिंग चित्रपट 'मेड इन चायना' मध्ये एका गुजराती व्यापाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो वाढलेले वजन वाढलेले पोट अशा लुकमध्ये दिसत आहे. याव्यतिरिक्त त्याच्या भुवयीदेखील एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. राजकुमारने भुवयांच्या हा लुक चित्रपटाचे दिग्दर्शक मिखिल मुसले यांचा कॉपी केला आहे.  

रघु मेहताला दिला इंटरेस्टिंग टच... 
राजकुमार म्हणतो, जेव्हा मी मिखिलला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याच्या भुवयाच त्याच्या चेहऱ्याचा सर्वात स्ट्रायकिंग पॉईंट होत्या. ते तुमच्या चेहऱ्याची कुणावरही जबरदस्त छाप सोडते. मी माझ्या प्रत्येक रोलसाठी एक्सपेरिमेंट करत असतो. त्यामुळे जेव्हा मी माझ्या या चित्रपटाला सुरुवात केली तेव्हा मी मिखिलच्या चेहऱ्याचे वैशिष्ठ्य वापरले. हे खूप वेगळे वाटत होते आणि मला वाटले की, मी माझ्या भूमिकेला एक इंटरेस्टिंग टच दिला आहे.   

दिवाळीला होईल रिलीज... 
'मेड इन चायना' मध्ये राजकुमारसोबत मौनी रॉय आहे जी रघुची पत्नी रुख्मिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच परेश रावल, गजराज रावदेखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट दिवाळीला रिलीज होणार आहे. ज्यांच्यासोबत 'सांड की आंख' आणि 'हाउसफुल 4' देखील रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...