आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार रावने नाकारली नथुराम गाेडसेंची भूमिका, टाळताेय नकारात्मक भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 जानेवारीला हाेऊ शकते मुहूर्ताचे चित्रीकरण, गांधीजींच्या भूमिकेसाठी नसीरला विचारणा

मुंबई : वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणारा राजकुमार राव सध्या विचार करून भूमिका निवडत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्याने राजकुमार संतोषी यांनी ऑफर केलेल्या 'गांधी वर्सेस गोडसे'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे. खरं तर संतोषी यांनी राजकुमारला नथुराम गोडसेंची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही.

या कारणामुळे राजकुमार करू इच्छित नाही गोडसेंची भूमिका : 

  • राजकुमारने नुकतेच 'जजमेंटल है क्या'मध्ये सायको किलरची भूमिका केली होती. ती त्याच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे राजकुमारने संतोषी यांना नकार िदला असावा.
  • दुसरे कारण असे की, गोडसेंविषयी राजकुमारने आपले मत अजून व्यक्त केले नाही. राजकीयदृष्ट्या पाहिले तर गोडसेंना उजव्या विचारसरणीने नेहमी नायक आणि डाव्या विचारसरणीने खलनायक म्हटले आहे. दुसरीकडे राजकुमारने कधीच आपली राजकीय विचारसरणी सांगितली नाही.

नसीरुद्दीनसोबत सुरू आहे चर्चा :
विशेष म्हणजे असगर वजाहतचे नाटक 'गोडसे@गांधी.कॉम' वर आधारित आहे. या चित्रपटासाठी संताेषी यांना गांधीच्या भूमिकेसाठी कलाकारदेखील मिळाले नाहीत. याच्या मागचे कारण अजून कळाले नाही. यासाठी नसीरुद्दीन शाह यांना विचारणा करण्यात आली आहे. नसीर यांच्याकडून अजून फायनल कॉल आला नाही. त्यांच्या जवळच्या मित्रानुसार, नसीरला ही भूमिका करायला आवडेल. ते संतोषीच्या या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देऊ शकतात. संतोषी या चित्रपटाची निर्मितीदेखील करणार आहेत. ते या चित्रपटाचा मुहूर्त शॉट गांधीजींचा बलिदान दिवस 30 जानेवारीच्या दिवशी शूट करू शकतात. यापूर्वी गांधीजींच्या भूमिकेसाठी संतोषीने 'लगे रहो मुन्ना भाई' फेम दिलीप प्रभावळकरसोबत चर्चा केली होती.