आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajkumar's Debut In Digital Platfor Via 'A Suitable Boy', A Show Directed By Mira Nair

'अ सुटेबल बॉय'वर आधारित शोमधून राजकुमारचे डिजिटलमध्ये पदार्पण, मीरा नायर करणार दिग्दर्शन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : राजकुमार रावला सध्या अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर मिळत आहेत. चित्रपटाव्यतिरिक्त त्याला वेब शोज आणि टीव्हीच्यादेखील अनेक ऑफर्स मिळत आहेत. नुकतेच त्याला 'सलाम बॉम्बे' आणि 'द नेमसेक'ची निर्माती मीरा नायर यांनी एका वेब शोची आॅफर दिली आहे. 

 

मीरा प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांची कादंबरी 'ए सुटेबल बॉय'वर आधारित एक शो बनवत आहे. यात १९ भाग असतील. बीबीसीच्या या मालिकेशी जोडलेल्या लोकांच्या मते, निर्माते राजकुमारला एका भागासाठी एक कोटी रुपये द्यायला तयार झाले आहेत. अशा प्रकारे त्याला या शोसाठी १९ कोटी रुपये दिले जाऊ शकतात. या शोमध्ये राजकुमारच्या व्यतिरिक्त तब्बू आणि रणदीप हुड्डादेखील मुख्य भूमिकेत आहेत. 

 

अक्षयनंतर ठरेल दुसरा कलाकार... 
विशेष म्हणजे, राजकुमारचे चित्रपटात चांगले करिअर सुरू असताना तो वेब शोकडे वळणारा दुसरा कलाकार ठरणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त अक्षय कुमारदेखील डिसंेबरपासून विक्रम मल्होत्राच्या वेब शोचे शूटिंग करणार आहे. या माध्यमातून तो वेब माध्यमात पदार्पण करणार आहे. 

 

प्रोजेक्टविषयी...  
निर्माते आणि राजकुमार यांची बातचीत शेवटच्या टप्प्यात आहे. दिग्दर्शक, कथा आणि कलाकाराच्या निवडीमुळे राजकुमार खुश आहे. 

 

कुठे होईल शूटिंग...  
शोचे १९ भाग असतील. याचे शूटिंग उत्तर प्रदेशच्या विविध शहरांत होईल 

 

कुठे येत आहे अडचण ... 
शूटिंग सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत चालेल. यादरम्यान राजकुमारकडे ऑलरेडी अनेक चित्रपटांच्या अॉफर्स आहेत. सध्या तो या चार महिन्यांच्या तारखा जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

का आहे खास...  
मीरासोबत काम करण्याची राजकुमारची इच्छा होतीच. त्यामुळे तो हा प्रोजेक्ट हातातून जाऊ देणार नाही. 

 

- 01 कोटी घेईल एका भागासाठी राजकुमार 
- 04 महिने चालेल शूटिंग 
- 19 भागांची असेल वेब सिरीज 

 

टीव्हीमधूनही अनेक ऑफर्स...  
राजकुमारला टीव्हीच्या अनेक रिअॅलिटी शोमधून जजच्या ऑफर्स येत आहेत. एमटीव्हीच्या एका शोची संकल्पना 'रोडीज' सारखी आहे. त्याच्या निर्मात्यांनी त्याच्यासोबत बऱ्याच दिवसांपासून मीटिंग करत आहेत. मात्र, तारखा जुळू शकल्या नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...