आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुरागच्या आगामी चित्रपटात असू शकतात राजकुमार-करिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: नुकतीच भूषण कुमार आणि अनुराग बसू यांनी मिळून एका प्रोजेक्टवर काम करण्याची घोषणा केली आहे. ऐकण्यात आले आहे की, हा मल्टिस्टारर प्रोजेक्ट असून त्याची कथा २००७ मध्ये आलेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' चित्रपटासारखी असेल. या प्रोजेक्टसाठी आधीपासूनच करिना कपूर खान, सैफ अली खान आणि अर्जुन कपूरला अॅप्रोच करण्यात आलेले आहे. तथापि, अर्जुनने हा चित्रपट तारखा शिल्लक नसल्याने साइन केला नाही. आता टीमने आणखी काही अभिनेत्यांना हा चित्रपट ऑफर केला आहे. सूत्रांच्या मते, 'अनुराग या चित्रपटात राजकुमार रावला घेऊ इच्छित आहे. त्याचे काम अनुरागला खूप आवडले आहे. त्याने आणि भूषणने राजकुमारची भेट घेऊन त्याला चित्रपटात एका पात्रासाठी ऑफर दिली आहे. ज्यामध्ये करिना कपूर खान आहे त्याच ट्रॅकसाठी अॅप्रोच केले आहे.' यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि नवाजुद्दीनलाही अप्रोच केले. नातेसंबंधांवर आधारित ही कथा अनुराग बसूनेच लिहिली आहे आणि तोच याचे दिग्दर्शन करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...