आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh Says BJP Wave Is Modi Wave News In Marathi

भाजपचा करिश्मा म्हणजेच मोदींचा करिश्मा, जोशींच्या वक्तव्यावर राजनाथ यांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा नव्हे तर भाजपचा करिश्मा आहे, या भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या वक्तव्यावर भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी खुलासा केला असून भाजपचा करिश्मा म्हणजेच मोदींचा करिश्मा असल्याचे सांगितले आहे.
मुरली मनोहर जोशी यांच्या वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भाजपमध्ये फुट असल्याचे चित्र तयार झाले होते. त्यामुळे राजनाथसिंह यांनी स्पष्टीकरण देऊन भाजपची भूमिका मांडली आहे.
यासंदर्भात वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांवर राजनाथसिंह म्हणाले, की असे कोणीही म्हटलेले नाही. मोदी देशातील प्रसिद्ध नेते आहेत. भाजप आणि मोदींना वेगवेगळ्या दृष्टिकोणातून बघता येणार नाही. मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. आमचा नारा मोदींभोवती फिरतो.
याबाबत भाजपचे आणखी एक नेते अरुण जेटली म्हणाले, की भाजपचा करिश्मा आणि मोदींचा करिश्मा यात कोणताही फरक नाही. भाजपमध्ये कोणत्याही स्वरुपाचे मतभेद नाहीत. भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व मोदी करीत आहेत. त्यामुळे भाजपचा करिश्मा आहे, की मोदींचा करिश्मा आहे यावरून प्रश्न निर्माण होत नाही. सध्या देशभरात आमच्या प्रचाराची हवा आहे.