आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Rajnigandha' And 'Little Baat' Fame Of Vidya Sinha Who Played The 70s

70 चे दशक गाजवणाऱ्या 'रजनीगंधा' आणि 'छोटी सी बात' फेम विद्या सिन्हा काळाच्या पडद्याआड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. नुकतेच त्यांना जुहू येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी वेळीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. 'रजनीगंधा' आणि 'छोटी सी बात' या चित्रपटांसह 70 आणि 80 चे दशक त्यांनी गाजवले होते. सोबतच, 2011 मध्ये त्यांनी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातही काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून हिंदी टीव्ही सिरियल्समध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्या 'कुल्फी कुमार बाजेवाला' या शोमध्ये आजींची भूमिका साकारत होत्या.
 
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या यांचे हृदय आणि फुफ्फुसांचा विकार होता. त्यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला देखील दिला होता. परंतु, दुर्लक्ष केल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. या दरम्यानही त्यांची परिस्थिती आणखी वाइट झाली आणि गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर रजनीगंधा, छोटी सी बात, किरायेदार आणि अशा संख्य चित्रपटांमुळे त्या 70 च्या दशकातील स्टार म्हणून समोर आल्या. यानंतर 80 च्या दशकातच त्यांनी बॉलीवूडला रामराम ठोकला. गेल्या काही वर्षांपासून त्या हिंदी सीरियल्समध्ये काम करत होत्या. काव्यांजली, कुबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यामध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.