आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2point0 Today: Rajnikant And Akshay Kumar Starer Film 2.0 Reeleased Today, Photos Of Fans Celebrating

'2.0'विषयी क्रेझी झाले फॅन्स, थिएटरच्या बाहेरपासून ते आतपर्यंत करत होते डान्स, कुठे पहाटे 4 वाजता होता शो तर कुठे पडद्यावर रजनीची एन्ट्री होताच थांबवण्यात आला चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर '2.0' हा चित्रपट रिलीज झाला आहे. दिग्दर्शक एस. शंकर यांच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ बघायला मिळाली. विशेषतः गुरुवारी झालेल्या सकाळच्या शोवेळी रजनीकांत यांचे फॅन्स अतिशय एक्साइटेड दिसले. सोशल मीडियावर काही फॅन्सचे व्हिडिओत समोर आले आहेत, यामध्ये ते थिएटरबाहेरच्या बाहेर आणि आतमध्ये डान्स करताना दिसत आहेत. थिएटरबाहेर लोक ढोलताशावर थिरकले. तर थिएटरच्या आत चित्रपट सुरु होताच प्रेक्षकांनी शिट्या वाजवत डान्स केला.


पहाटे 4 वाजता झाला पहिला शो... 
- रिपोर्ट्सनुसार, साऊथ इंडियात या चित्रपटाचा पहिला शो पहाटे चार वाजता झाला. त्यापूर्वी रजनीकांत यांच्या चाहत्यांनी त्यांच्या कटआऊटला दुधाने अभिषेक घातला आणि नंतर ढोलताशावर ठेका धरला. मुंबईतही काही ठिकाणी असाच नजारा बघायला मिळाला. लोक पहाटे थिएटरबाहेर तिकिट खिडकीबाहेर उभे दिसले.

 

3 मिनिटांसाठी थांबवण्यात आला चित्रपट...
- सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. थिएटरच्या स्क्रिनवर रजनीकांतची एन्ट्री होताच तीन मिनिटांचा पॉज घेण्यात आला. चाहत्यांनी स्क्रिनवर रजनीकांत यांच्या एन्ट्रीचे वेलकम केले. 


या वर्षातील मोठा ओपनर ठरणार '2.0'
- '2.0' हा चित्रपट यावर्षीचा मोठा ओपनर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जौहर यांच्यानुसार, हिंदी बेल्टमध्ये हा चित्रपट 20-25 कोटींचे कलेक्शन करेल. तर सर्व भाषा (हिंदीसोबत तामिळ, तेलुगु आणि अन्य 12 भाषा) चे एकुण कलेक्शन पहिल्या दिवशी 100 कोटींच्या घरात होण्याची शक्यता आहे. मुळ तामिळमध्ये बनलेला हा चित्रपट ओरिजिनली 3 D कॅम-याने शूट करण्यात आला आहे. हा भारतातील पहिलाच असा प्रयोद आहे. भारतात बनलेल्या या सर्वात महागड्या चित्रपटाचे बजेट 510 कोटी रुपये आहे.  

बातम्या आणखी आहेत...