Home | News | Rajnikant have 360 crore assets,

फक्त 2000 मध्ये केली होती 13 वर्षे लहान श्रीदेवीच्या मुलाची भूमिका, आज एका चित्रपटाचे घेतात 65 कोटी, 360 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत रजनीकांत, जगतात सामान्य आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

चित्रपट फ्लॉप झाल्यावर परत करतात डिस्ट्रीब्यूटर्सचा पैसा, दानमध्ये जाते अर्धी कमाई

 • Rajnikant have 360 crore assets,

  एन्टटेन्मेंट डेस्क. रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 चित्रपटाची कमाई नवीन रेकॉर्ड बनवत आहे. हिंदीमध्ये चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. रिपोर्ट्नुसार डायरेक्टर शंकरने या चित्रपटासाठी रजनीकांतला 65 कोटी फीस दिली होती. पण एकेकाळी ते 2000 रुपये फीस घेत होते. या चित्रपटात श्रीदेवीला 5000 रुपये मिळाले होते. गेल्या 10 वर्षात रजनी यांची फीस दुप्पटीपेक्षाही जास्त झाली आहे. 2007 मध्ये त्यांचा 'शिवाजी : द बॉस' चित्रपट आला होता तेव्हा त्यांना 26 कोटी रुपये मिळाले होते.

  नुकसान झाल्यावर परत करतात फीस, चॅरिटीमध्ये पुढे आहेत थलाइवा
  1976 मध्ये बालचंदर यांच्या Moondru Mudichu चित्रपट रजनी यांचा चौथा चित्रपट होता. पण त्यांची प्रमुख भूमिका असणारा हा पहिला चित्रपट होता. यावेळी श्रीदेवीने हिरोइन म्हणून काम केले होते तर कमल हासननेही कॅमिओ केला होता. श्रीदेवीने स्वतः हा खुलासा केला होता की, त्यांना या चित्रपटासाठी 5000 रुपये फीस मिळाली होती, तर रजनीकांत यांना फक्त 2000 रुपये मिळाले होते. कॅमिओसाठी हासन यांना 30 हजार रुपये फीस देण्यात आले होते. या चित्रपटात रजनी यांनी स्वतःपेक्षा 13 वर्षे लहान श्रीदेवीच्या सावत्र मुलाची भूमिका साकारली होती.


  रजनी यांचा पहिला चित्रपट 1975 मध्ये आलेला 'अपूर्व रागंगल' हा होता. याचे डायरेक्शर के. बालचंदर होते. या चित्रपटात प्रमुख भूमिका ही कमल हासन यांनी साकारली होती. बालचंदर यांच्यासोबत भेट झाली तेव्हा रजनी मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये होते.

  फोर्ब्स लिस्टमध्ये एंट्री
  रजनीकांत 2017 मध्ये कमाईच्या बाबतीत मागे राहिले होते. पण 2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणा-या सेलेब्सच्या फोर्ब्स लिस्टमध्ये त्यांची एंट्री झाली. 50 कोटींची कमाई करुन ते 14 व्या रँकवर आहेत.

  तरीही साधे आयुष्य जगतात रजनीकांत
  360 कोटींच्या संपत्तीचे मालक असूनही रजनी खुप साधे आयुष्य जगतात. स्वभावाने खुप शालीन असलेल्या रजनी यांना दिखवा आवडत नाही. ते नेहमी साध्या कपड्यांमध्ये दिसतात आणि साधे जेवण करतात. त्यांची दिनचर्या सामान्य व्यक्तींप्रमाणे आहे. रजनी चॅरिटीमध्ये सहभागी होत असतात. लेख नमन रामचंद्रन यांनी आपल्या Rajinikanth - The Definitive Biography' पुस्तकामध्ये सांगितले की, ते आपली अर्धी कमाई दानमध्ये देतात.

  चित्रपट फ्लॉप झाला तर फीस परत करतात
  चित्रपट चालला नाही तर रजनीकांत डिस्ट्रीब्यूटर्सला फीस परत करतात. रजनी यांनी कधीच कोणतीही जाहिरात केलेली नाही. 2002 मध्ये त्यांनी चेन्नईमध्ये स्वतःचे घर खरेदी केले होते. याची मार्केट व्हॅल्यू आज 35 कोटींपेक्षा जास्त आहे. साउथच्या या सुपरस्टारकडे 2.5 कोटी किंमतीच्या 3 लक्जरी कार रेंज रोवर, रॉल्स रॉयस बेंटले आणि इनोव्हा आहे. त्यांनी 110 कोटींचे इनवेस्टमेंट केली आहे.

  बस कंडक्टर होते, तेव्हाही होता अॅक्टिंगचा शौक
  रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकात झाला. ते आपले आई-वडील जीजाबाई आणि रामोजी राव गायकवाड यांचे चौथे आपत्य होते. रामोजी पोलिस कॉन्स्टेबल होते तर आई हाउसवाइफ होत्या. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. रजनी 5 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. बेंगळुरुच्या आचार्य प्रशालेत त्यांनी सुरुवातीला शिक्षण घेतले. यानंतर ते रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद बालक संघात शिकले. त्यांची मुळ भाषा मराठी आहे, याचा प्रभाव त्यांच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो.

Trending