आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - एखादा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच हिट झाला आहे असे तुम्ही कधी ऐकले आहे का? असे घडले आहे रजनीकांत आणि अक्षयकुमार स्टारर 2.0 चित्रपटाबाबत. चित्रपट अद्याप मोठ्या पडद्यावर रिलीज झालेला नाही. पण तरीही त्याआधीच कमाईचा आकडा 350 कोटींच्या पुढे सरकला आहे. चित्रपटाने आतापर्यंत 370 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने सॅटेलाइट राइट्स, डिजिटल राइट्स आणि डिस्ट्रिब्यूशन राइट्ससाठी ही कमाई केली आहे. लाइका प्रोडक्शन्सने या चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स 120 कोटींमध्ये विकले आहेत. तर डिजिटल राइट्सचे सर्व व्हर्जन (हिंदी, तमिळ आणि तेलुगू) 60 कोटींत विकले गेले आहेत. एवढेच नाही नॉर्दन बेल्ट, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्येही डिस्ट्रिब्यूशन राइट्स विकले आहेत.
100 कोटींचे अॅडव्हान्स बुकींग
या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगचेही अनेक रेकॉर्ड बनले आहेत. बंपर अॅडव्हान्स बुकिंगमुळे '2.0'ने रिलीजपूर्वीच 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट कमाईच्या दिवशी सर्वाधिक कमाईचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यताही आहे.
रोबोटचा सिक्वल आहे 2.0
2.0 चित्रपट 2010 मध्ये आलेल्या रजनीकांत आणि ऐश्वर्या राय स्टारर 'रोबोट'चा सिक्वल आहे. पण 2.0 मध्ये ऐश्वर्या नाही. तर अक्षय कुमार या चित्रपटाच नकारात्मक भूमिकेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.