आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन अॅक्टर राजपाल यादवचा तुरुंगवास संपला, तीन महिन्याची शिक्षा केली पूर्ण; बाहेर येताच व्यक्त केले आपले दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडमधील कॉमेडियन अॅक्टर राजपाल यादव नुकताच आपला तीन महिन्यांची शिक्षा भोगून बाहेर आला आहे. आता त्याने आपले दुःख व्यक्त केले आहे. तो म्हणाला की,'मला असे वाटतेय की मी लोकांवर जास्तच विश्वास ठेवला आणि लोकांनी त्याचा फायदा घेतला.पण मी आता याबाबत काही सांगणार नाही. मला आता फक्त पुढे जायचे आहे. कारण आयुष्याकडून मला अजून बरंच काही मिळायचे बाकी आहे.' राजपाल यादववर 5 कोटी रूपयांचे कर्ज न फेडण्याचा आरोप होता. यामुळे त्याला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. आता तुरुंगातून परतल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.


हातातून गेली 'ड्रीम गर्ल' 
रिपोर्ट्सनुसार राजपाल यादवच्या तुरुंगात जाण्यामुळे निर्माती एकता कपूरची 'ड्रीम गर्ल' हा सिनेमा त्याच्या हातून निघून गेला. मिळालेल्या माहितीनुसार राजपाल या चित्रपटात मुख्य भूमिका करणार होता. पण आता ती भूमिका आयुष्मान खुराणाला देण्यात आली आहे. राजपालने चित्रपटावर काम करण्यास सुरुवातही केली होती. पण तुरुंगात गेल्यामुळे तो शुटिंग पूर्ण करू शकला नाही. 


आगामी प्रोजेक्टबाबत आहे उत्साहित 
राजपाल यादवचे त्याच्या आगामी चित्रपटांविषयी म्हणणे आहे की, 'मी लवकरच सुरज पांचोली आणि इसाबेल कैफसोबत 'टू टाइम डान्स' या चित्रपटाची शुटिंग सुरू करणार आहे. यातील काही भागाची शुटींग झाली आहे आणि राहिलेला भाग लवकरच पूर्ण शुट करणार आहोत. हा चित्रपट अगोदरज पूर्ण झाला असता. मी फिल्म मेकर्सचे आभार मानतो की, त्यांनी मी परत येण्याची वाट पाहिली.' पुढे त्याने सांगितले की, तो 'जाको राखे साइयां' चे पूर्ण शेड्यूल संपवणार आहे. तर डेव्हिड धवन आणि प्रियदर्शनसोबत आगीमी चित्रपटासाठी बोलणी सुरू आहे. तीन महिन्यांच्या तुरुंगवासानंतर राजपाल फिल्मच्या सेटवर जाण्यासाठी उत्सुक आहे. 


तुरुंगात भरवत होता 'राजपालची शाळा'
राजपलाने आपले तुरुंगातील दिवसांबाबत सांगितले. तो म्हणाला की, 'तुरुंगीत शिस्तीचे काटेकोरपणे पालन होते. तिथे सर्व नियमांचे पालन करावे लागत असे. मी इतर कैद्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 'राजपालची शाळा' नावाचे एक सेक्शन ठेवत होतो.' मी रोज व्यायाम करत होतो. तसेच तेथील ग्रंथालयात जाऊन वाचन करत होतो. 

बातम्या आणखी आहेत...